विचारयज्ञमध्ये शोधा

Wednesday, August 10, 2011

मला आता बोलायचच आहे

खूप काही लिहावसं वाटतं
खूप काही बोलावसं वाटतं
पण का कुणास ठाऊक
शब्द ओठी फुटतच नाहीत
अश्रू डोळ्यांत आहेत
पण बाहेर तरळतच नाहीत
खूप घुसमट होतेय
पण
मला व्यक्त करताच येत नाही
पण
मला व्यक्त करताच येत नाही
तो अन्याय बघून चीड उठते,
हात सरसावतात,
पण पुन्हा थांबतात
कारण
कायदा मला मोडताच येत नाही
कायदा मला मोडताच येत नाही
एकदा सगळ्यांना सांगावसं वाटतं
अगदी
ओरडून ओरडून सांगावसं वाटतं
पण अन्यायाविरुद्ध आजकाल
आवाजच फुटत नाही
दोष तरी मी देऊ कुणाला
भित्रेपणा तर हा मीच कवटाळला
पण एकदा मला बोलायचंच आहे
बेभान एकदा तरी व्हायचंच आहे
का मी सहन करू अन्याय
न्यायासाठी एकदा कायदा
मोडायचाच आहे
जमेल का मला हे सगळं
पुन्हा तोच क्षीण आवाज
येईल का मला हे धैर्य आगळं
पुन्हा  तोच क्षीण प्रश्न
उबग आलाय या बेगडी
धर्मनिरपेक्षतेचा  
आपल्याच बांधवांच्या
फसवणुकीचा
उबग आलाय या खोट्या
लोक (?) तंत्राचा
उबग आलाय या
भित्र्या मनाचा
कधी उठेल तो आवाज माझा
अन्यायाविरुद्ध जो कधीही ना झुकला
कधी साहस तेच प्रकटेल
अन्याय होण्यापूर्वीच जे नष्ट करेल
मिळेल कधी मला अस्तित्व माझे
सत्यनिष्ठेचे समृद्ध राज्य माझे
सत्यनिष्ठेचे समृद्ध राज्य माझे

याच विचारांची माझी हिंदी कविता : दम घुटता है मेरा अब यहाँ