सरस्वती स्तोत्र

शारदीय नवरात्र जवळच आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपासना करण्यास दिव्यं असतात. यावेळी नवरात्रीत देवीस ही प्रार्थना आहे.... 

श्री शारदे जगन्माते बुद्धीदायिनी 
कृपाकटाक्षे पाही मज हे शक्तीदायिनी 
शक्तिरुपिणी मम हृदयी जागृत तू अससी
कार्यरुपिणी तू हृदया या उमलविसी
तुजवीण ज्ञान प्रकट होणे न शक्य काही
तुजवीण आरंभ अंत जगती नसेचि पाहि
पाहि पाहि हे मात: मज पाहि आता
मी बालिका तव आई पाहि तू मज आता
तुजवीण आधार मज उरला नाही
हृदयी असुनी दूर तू का भाससी आई
आई आई हृदय हे पुकारते हे आई
आता तरी धाव माते बाळास आज पाहि
बाळ तुझे हे श्रमले बहु संसार क्लेशांनी
आलिंगन दे गं आता हे सरस्वती आई
आशिष तव मज पूर्वीच लाभला
असे असता दु:खात जीव का हा पोळला
ज्ञान जे मज दिले तू प्रकट का नं होई
यास्तव हाक मारिते तुज हे सरस्वती आई
आई! तुझी कृपा ही जगास कळू दे
आई! मला आता पूर्ण व्यक्त होऊ दे

-मोहिनी