धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय?


धर्मनिरपेक्षता याचा अर्थ नक्की काय, यावर काही दिवसांपासून मनात मंथन सुरु आहे. आज मला पडलेले प्रश्न विचारयज्ञात मांडते, कदाचित उत्तरे सापडतील.

१. धर्मनिरपेक्ष आयुष्य जगणे वास्तवात शक्य आहे काय?

२. धर्म, पंथ, मत, Religion, यांतील भेद आपल्याला सुस्पष्ट ज्ञात आहेत काय?

३. आपला कायदा आणि आपल्या राष्ट्रातील शिक्षणव्यवस्था वरील भेद निसंदिग्धपणे सुस्पष्ट करून सांगतात काय?

४. आपली घटना Secularism म्हणजे सर्वधर्मसमभाव असे सांगते. सर्व-धर्म म्हणजे नक्की काय? असा हा समभाव सगळ्यांच्याच मनात खरंच आहे काय? आणि तो येणे शक्य आहे काय? वेगवेगळ्या पंथीयांसाठी वेगवेगळे कायदे, ही विसंगती सर्व-धर्म-(पंथ)-सम-भाव टिकू देईल का?

५. सनातन संस्कृती ही एक मार्गदर्शक ग्रंथ व प्रेषित यांत मर्यादित (Limited) करता येईल काय? याचे उत्तर जर नाही असेल, तर सर्व-धर्म(धर्म की पंथ?)-सम-भाव म्हणजे नक्की काय?

६. सर्व- पंथांचे सर्वांना सर्व ज्ञान आहे काय?

७. ते ज्ञान प्राप्त करणे सुलभ आहे काय?

८. आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष असण्याची आवश्यकता आहे काय?

९. लोकसंख्या वाढीचे कारण एका व्यक्तीने बहुविवाह करणे नाही काय?

१०.आपल्या राष्ट्राचे तुकडेच मुळी पंथाच्या नावाने केले गेले, यावर कथित धर्मनिरपेक्षता किंवा वास्तव धर्म(पंथ) निरपेक्षता आपल्या राष्ट्रीय सुरक्षेस बाधक सिद्ध होत नाही काय?

हे आणि असे अनेक प्रश्न जिहाद- निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत हे छोटेसे पुस्तक जरा वाचल्यावर मनात आले. आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे ही कळकळीची विनंती.

पुस्तकाची थोडक्यात माहिती

जिहाद

निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत
लेखक:सुहास मजुमदार
अनुवाद: शरद मेहेंदळे, डाॅ. श्रीरंग गोडबोले
सवलत मूल्य: रु. २५/- (मूळ मूल्य: रु. ५०/-)  
प्रकाशक आणि विक्री केंद्र:
भारतीय विचार साधना पुणे

हे  पुस्तक मूळ इंग्रजी ऑनलाइन Jihad - The Islamic Doctrine of Permanent War 



जिहाद व श्रीमद्भगवद्गीता यांचा तौलनिक अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

पाकिस्तान निर्मिती, Direct Action, काश्मीर प्रश्न आणि सर्व-पंथ-सम-भाव यांचे नवीन आयाम हे पुस्तक वाचल्यावर उलगडतात.
लेखक व अनुवादकारांना अनेको साधुवाद.

हा लेख म्हणजे केवळ विचारमंथन आहे, कुणालाही दुखावण्याचा त्यामागे उद्देश नाही.






Comments