सशक्त आणि संगठीत जीवन - म्हणजेच सुरक्षा

रक्षाबंधनाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.



काल पुण्यात ध्वम विस्फोटांची मालिका झाली ज्याला केवळ खोडसाळपणा असे म्हटले गेले. केंद गृह सचिवांनी हा आतंकवादी हल्ला असल्याची शक्यता नाकारली नाही.
या वक्तव्यांनी आपल्याला कितीही राग आला तरी कमी किंवा जास्त तीव्रतेचे दहशतवादी हल्ले, दंगे भोगण्याशिवाय आपल्याकडे सध्या तरी काही पर्याय दिसत नाही. आणि दिवसेंदिवस आपले जीवन अधिकाधिक असुरक्षित होता आहे. कुठल्या सुरक्षेसाठी आणि कुणाकडे याचना करणार?

आपणच सशक्त होण्याची आता गरज आहे. आपण ज्याला अहिंसा समजून गेली कित्येक दशके भाबडेपणाने जगात आहोत, ती अहिंसा नसून आपण 'आपल्याला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे' हेच विसरल्याची आणि आपल्याच मूर्खपणाची पराकाष्ठा आहे. आपल्याला सुरक्षित जीवन देणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे. आपल्या आयुष्याचा सौदा करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, हेच आपण विसरलो आहोत.

आपण हिंदू सुरक्षित नाही कारण आपण सशक्त नाही, आणि संगठित नाही. आपण आत्मसुरक्षेइतके तरी सशक्त झालेच पाहिजे. आपल्या मतालाही या देशात महत्त्व हवे असेल तर आपण संगठीत झालेच पाहिजे.
हिंदुनी संगठित शक्ती एखाद्या निवडणुकीत दाखवली तर पहा पुढे छद्म पंथनिरपेक्षतेचे  व्यापारी नेते आणि पक्ष कसे कट्टर हिंदुत्ववादी बनतील .

ब्राह्मणद्वेष पसरविणारे मुळात हिंदू द्वेषच पसरवित आहेत आणि मुस्लीम मतांधतेचे आणि मदांधतेचे पुरस्कर्ते आहेत. हा मुद्दा आपण दुर्लक्षून चालणार नाही.

आज रक्षाबंधनाच्या पावन दिवशी आपण सगळे हीच शपथ घेऊ की सुरक्षित जगू , संगठीत जगू आणि मरू तर शत्रूला नष्ट करून मरू. आत्मसुरक्षा हे पाप नाही पण भेकड जीवन मात्र महापाप आहे, मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.. आपला मुख्य शत्रू दहशतवाद  नसून छद्मपंथ निरपेक्षता आहे. आपण सशक्त आणि संगठित  झालो तर दहशतवादाविरुद्ध सरकारला कार्यवाही करावीच लागेल. आपले मत सत्तांतर घडवून आणू शकते हे, हिंदुच्या जीवाचे व्यापारी बनलेल्या नेत्यांना कळले तर कसाब एक दिवसही फासापासून दूर राहू दिला जाणार नाही, अफजल गुरुसाठी कुणी न्याय मागणार नाही.

सशक्त आणि संगठीत जीवनच सुरक्षित असू शकते. 

Comments