विचारयज्ञमध्ये शोधा

Saturday, September 5, 2015

कविता: कृष्ण...कृष्ण...कृष्ण

विचारयज्ञ परिवारातील सर्व वाचकांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा उत्सव कृष्णभक्तीमय , आनंद आणि उत्साहाने भरलेला ठरो ही कृष्णास प्रार्थना. कृष्णनाम हे इतके गोड आहे की नाव घेताच काव्य स्फुरते.. कृष्णाच्या मधुर नावास समर्पित आजचे काव्य.

Image: Bhagwan Shrikrishna


जीवनाचा अर्थ सापडे आज
कृष्ण... कृष्ण... कृष्ण...


नाम तुझे केवळ एक तारणहार
कृष्ण... कृष्ण... कृष्ण...

दुस्तर संसारी, भवभय वाढता भारी
एक तुझाच आधार
कृष्ण कृष्ण कृष्ण

नाम तुझे केवळ एक तारणहार
कृष्ण... कृष्ण... कृष्ण...

मिळे न शांती क्षणभरही
करिता अनंत उपाय
नाम तुझे येता ओठीं अवचित
आनंद भरुनि येई हृदयात
कृष्ण...कृष्ण...कृष्ण...

विचारयज्ञ मध्ये भक्तिमय कविता: