विचारयज्ञमध्ये शोधा

Friday, April 19, 2013

श्रीराम जन्मले - प्रभू अवतरले


नमस्कार बंधू भगिनींनो! आज प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म. रामनवमी. राम असे एकदाच म्हटले तरी हृदय आनंदाने भरून जाते, पुढे बोलायला शब्दच उरत नाही. आज तर अशा रामाचा जन्म..म्हणजे सगळीकडे आनंद केवळ आनंद ..:). हा दिव्य आनंद आपल्या सर्वांच्या जीवनी भरून राहो ...हार्दिक शुभेच्छा. 

आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या चरणकमळी एकंच प्रार्थना "हे प्रभो ! मन सदा धर्मातच रममाण राहो. अधर्माचा तर मनासही स्पर्श नको. मला तुझी कायम आठवण राहील की नाही भीती वाटते, म्हणून तूच माझ्या हृदयात सदासाठी विराजमान हो. म्हणजे तुझ्यावाचून माझा एक क्षणही जाणार नाही. आणि जिथे तू, तिथेच धर्म, शांती आणि प्रेम आहे. तुझ्याविना मात्र दु:खच आहे. म्हणून एकच प्रार्थना कायम माझ्या हृदयात राहा. धर्म – अध्यात्म आणि तुझे प्रेम हे सगळे तर तुझ्या हृदयात राहण्याने सहजच प्राप्त होणार आहे. 
तुझ्याविना अर्धा क्षणही व्यर्थ न जाओ."