प्रार्थना: अर्पित

विचारयज्ञ परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या विचारयज्ञाची सुरुवात दिवाळीच्याच शुभदिनी २०१० मध्ये झाली. आपल्या आत्मप्रकाशाच्या आधारावर भयरहित होऊन जगण्याची आणि व्यक्त होण्याची शक्ती असणाऱ्या माझ्या सद्गुरुंच्या कृपेस अनंत प्रणाम. लेखणीची शक्ती मला ब्लॉगिंगमुळे अनुभवायला मिळाली.

आठ वर्ष मराठीत अविरत लिहिण्याची इच्छा, ऊर्जा आणि प्रोत्साहन आपल्या स्नेहामुळेच शक्य झाले. आभार मानण्याने औपचारिकता आल्यासारखी वाटते. तरीही माझ्या छोट्या छोट्या प्रयत्नांवर तुम्ही प्रेम केले, मला आपलेपणाने मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले त्याबद्दल मनापासून आभार. विचारयज्ञावर आपले प्रेम सतत वाढत राहो हीच प्रार्थना.   

आज दिवाळी आणि विचारयज्ञाचा जन्मदिन असा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी, जी व्यक्ती माझी प्रेरणा आहे, ज्या व्यक्तिला समर्पित स्तोत्राने माझ्या आयुष्यात लेखनाची अनमोल भेट आली त्या प्रभू रामचंद्रांस आज प्रार्थना करीत आहे.


कठिण असोत चालण्या 
मजसाठी अत्यंत जरी ते
पंथ जे मी निवडी जीवनी
तुलाच ते सर्व मिळो राघवा

Text Image for Vicharyadnya Marathi Prarthana 'Arpit

थांबणे न कुठे आता मार्गी या
वाट चालणेच तुजकडे ध्येय मजला

हर विचार उठे मनी जो
तुझीच पूजा बनो राघवा

हर शब्द उच्चारी जी जिव्हा
प्रार्थना बनो तुझीच राघवा

स्वप्न मन जे रचत असे सदा
कल्पना अनंत विणत असे,
दिवा वा निद्री,
ध्यान ते होवो तुझेच राघवा

आरंभ, मध्य आणि अंतीही
हर कर्म होवो पूजा
तुझीच राघवा

आणि हर पूजा जी घडे
या हृदयाने
घडो तुझीच राघवा

हर पूजा हर रूपात
स्वीकार तूच राघवा,
हे मंदस्मित राघवा,
स्वीकार तूच राघवा

गुणदोष मनाचे तुज समर्पित
तूच पावन कर हे जीवन
सदाच आहे तुजला अर्पित   

वितळो आज ते अंतर 
ठेवी मजला जे दूर तुजपासून 
फळ देई हेच जीवनाचे 
सर्वस्व मम तुलाच अर्पित 

विचारयज्ञ आता ट्विटर वरही, तुम्ही फॉलो केले का?: @Vicharyadnya

This poem is available in Hindi: Arpit
Originally written in English: Solace in God

विचारयज्ञात अन्य पोस्ट्स: 


विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या पोस्ट्स लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address:





Comments