Wednesday, July 11, 2018

कविता: सावल्या आठवणींच्या

आठवणींच्या सावल्या मनास काय सांगतात? एक छोटीशी काव्यपाकळी... 

ही कविता आपल्या इंग्रजी ब्लॉगवरील शॅडोज या कवितेचे मराठी रूपांतरण आहे.

Thursday, June 7, 2018

चारोळी: निष्ठूर

कठोर उन्हाळ्यानंतर आपण सगळे पावसाची वाट बघत आहोत. ढगही येतात. पण सूर्य मात्र तळपतोच आहे. उन व उकाड्यापासून काही आपली सुटका नाही. देशातील सध्याची स्थिती पाहता आजचे हे आकाश मला असे दिसले,

Sunday, May 13, 2018

मदर्स डे: लव यू आई

मदर्स डे निमित्त काही भेटवस्तू विकत घेण्याऐवजी मनातल्या भावना व्यक्त करणारे स्वतः चे छोटेसे कलात्मक काहीतरी आईसाठी. पूजेत आपण अक्षता वापरतो कारण ते अ-क्षत म्हणजे न तुटलेले तांदूळ असतात. तसेच अक्षत या डिजीटल निर्मितीमध्ये आईच्या अक्षत स्वास्थ्य व आनंदासाठी आणि आईच्या पूजेसाठी व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न.

Saturday, March 31, 2018

चारोळी: वृक्ष

रणरणत्या उन्हाळ्यात शीतल सावली देऊन आपले पर्यावरण आल्हाददायक बनविणारे आपले मित्र वृक्ष. त्यांच्या प्रेमावर ही चारोळी.

Text image for Vicharyadnya Marathi Charoli Vriksha


अबोल मित्र जीवनाचे
गुपितं निःशब्द बोलती
सळसळ हळव्या पानांची
ऐकूनि शब्द स्तब्ध होती

Tuesday, February 27, 2018

मराठीजन्म

आज जागतिक मराठी दिन. 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी'...खरंच आपले किती भाग्य की मराठी आपली मातृभाषा आहे.

संत ज्ञानेश्वर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, कवि कुसुमाग्रज, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, पु. लं. देशपांडे, बालकवी, बहिणाबाई यांना वाचण्याचे भाग्य आपल्याला लाभले, आपला मराठी भाषिक म्हणून जन्म झाला. 

Tuesday, February 6, 2018

चारोळी: कोडे

कविता लिहिताना खूप विचार केला तर कधी कधी असं होतं की कविता कविताच राहत नाही. या भावनेवरच 'कोडे' ही चारोळी.

शब्दांच्या गुंत्यात अडकले 
भाव आतच विरून गेले
गीत तुजसाठी जे लिहायचे 
कोडे आज मलाच बनले