|| श्री श्री गुरवे नमः ||
कृपा प्रार्थिते मी , कृपा प्रार्थिते मी ||
प्रभो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || १ ||
नव यज्ञ हा चैतन्याचा ,ब्रह्मांडी पसराया ||
प्रभो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || २ ||
वाट जरी ही विलक्षण, कठीण मात्र मुळी नसे ||
कृपा तुमची जर मज प्राप्त असे || ३ ||
यास्तव पुनः पुनः ,
गुरो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || ५ ||
मी कोण इथे, ही इच्छा तव आहे ||
प्रभू पूर्ण करण्या सदा साथ आहे || ६ ||
इच्छेनेच चाले विश्व हे त्याच्या ||
कार्य हे होईल इच्छेनेच त्याच्या || ७ ||
यास्तव चिंता मनी ती नसावी ||
कृपा पूर्ण होण्या वाट ती बघावी || ८ ||
अजून आहे पुढील भागात
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........