सद्गुरू हे केवळ एक शरीर नसून ते सर्वात महान तत्त्व आहे, असे परम पूज्य सद्गुरूदेव काकामहाराज नेहमी सांगतात. अशा ह्या सद्गुरुतत्त्वाचे सामान्य माणसांसारखे जगणारे साधे सरळ रूप म्हणजे माझी सद्गुरूमाऊली! काकामहाराज हे माझीच नसून अखिल विश्वाचीच माउली आहे. सद्गुरू माउली आहे. त्यांचे जीवन, कार्य म्हणजे एक उपदेश आहे. ते चैतन्याची पूजा, प्राणाची पूजा करण्यास सगळ्यांना सांगतात. पण ते जे सांगतात त्याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे त्यांचेच जीवन होय. त्यांच्या अमृतमय उपदेशांचा अर्थ उलगडतो त्यांचे जीवन नीट जवळून पाहिल्यास. अर्थात त्यांचे हे भव्य दिव्य रूप त्यांच्या कृपेनेच उलगडते अगदी सहज. सिद्धायोगासारखे सहज!
प. पू. नारायण काका महाराजांची चैतन्यानेच केलेली ही अक्षरपूजा , त्यांची आरती!
जय देव जय देव जय सद्गुरुदेवा , आरती तुमची करितो स्वीकारा सेवा
जय देव जय देव ... || धृ ||
नारायणे भूवरी अवतार घेउनी, स्वस्वरूपी जना रममाण करुनी ||
विश्वकल्याणाचा दिधला हा ठेवा, जय देव जय देव... || १ ||
चैतन्याची पूजा हे जीवन आपुले, स्मरता गाता ते भवदुःख नासे ||
प्राणयोग विश्वा दिला प्राणप्रिय देवा, जय देव जय देव .... || २ ||
आता एकची मागणे पदर पसरुनी, चैतन्याची पूजा घ्यावी करुनी ||
चैतन्य चैतन्य ही एकची सेवा,जय देव जय देव .......
जय देव जय देव जय चैतन्यदेवा, श्री चैतन्यदेवा,
आरती तुमची करितो स्वीकारा सेवा, जय देव जय देव.....|| ३ ||
आरती पूर्ण होता प्रसन्न मन झाले, हो अति प्रसन्न मन झाले ||
दु:ख, दुर्दैव पूर्ण नष्टचि झाले , नारायणकृपा लाधली विश्वा ||
जय देव जय देव जय सद्गुरुदेवा,
आरती तुमची करितो स्वीकारा सेवा जय देव जय देव ..|| ४ ||