मरण दिसले

मरण दिसले आज माझे
ठाकलेले उभे समोरी

चित्त झाले भ्रांत माझे
काय हे ठाकले समोरी

संपले का स्वप्न माझे
भय क्षणैक वाटले

ईश्वराचे स्मरण होता
भाव नवे दाटले

भय नव्हते मम ठायी
सत्य मग हे उमगले

भास तो तर मनाठायी
मज बाधा त्याची नसे


प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही क्षण मनाची जी अवस्था झाली ती वरील शब्दांत व्यक्त झाली आहे.

पुढचे लेख प्रसिद्ध करण्यात काही ना काही अडचणींमुळे उशीर होतोय, त्याबद्दल क्षमस्व!

आता वीजकपात पुन्हा सुरु झालीय. कधी संगणकाच्या तांत्रिक अडचणी असे चालू आहे. त्यातच प्रकृती अस्वास्थ्य (फारच जड जड शब्द होताय !) असो!

हा ब्लॉग सुरु होऊन अजून एक महिना ही झाला नाही, पण सद्गुरूंची कृपा आणि आपले सर्वांचे प्रेम यांमुळे खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. आपल्याला वाट बघत ठेवणं, अजिबात आवडत नाही. पण काही ना काही अडथळे येत राहतात आणि विलंब होतो.

आपण धैर्यपुर्वक वाट पाहता , आपले याबद्दल आभार मानणे म्हणजे आपल्या प्रेमाचा अपमानच होईल.

मला माहीत आहे, आपण यापुढेही असेच सांभाळून घ्याल. इथे भेटत राहू.
Comments