नि:शब्द बोध हा शब्दात मांडीला.......
शून्याचा खेळ हा गणितात बांधिला
अगणित शब्द संपले तेथे
शून्याचाच बोध पुन्हा उठे येथे........
हाच पाढा जीवनाचा ......
विचार का उगाच दु;खाचा.......
बोधातीत बोध मनाचा ........
शून्यात लय सुख दु:खाचा........
शून्यात लय शून्याचा
संपले शून्य उरले शून्य .....
जीवन भरले आज शून्य .....
शून्याचा खेळ हा गणितात बांधिला
अगणित शब्द संपले तेथे
शून्याचाच बोध पुन्हा उठे येथे........
हाच पाढा जीवनाचा ......
विचार का उगाच दु;खाचा.......
बोधातीत बोध मनाचा ........
शून्यात लय सुख दु:खाचा........
शून्यात लय शून्याचा
संपले शून्य उरले शून्य .....
जीवन भरले आज शून्य .....
मी मराठी वर नितीन राम यांनी एक सुंदर चर्चा सुरु केली...त्याला उत्तर लिहिताना हे स्फुरलं......असंच....सहज....
मूळ चर्चा इथे बघावी ..नितीन राम यांना खूप खूप धन्यवाद.....त्यांनी
चर्चेत उत्तरोत्तर अध्यात्म उलगडले .....
आणि
त्याला उत्तर म्हणून लिहिताना ...
मलाही जीवनाचे काही पदर उलगडले........
उलगडता उलगडता सारे संपले .....
संपता संपता नवे विश्व सुरु झाले ........
संपले तेही शून्य आणि सुरु झाले तेही नवे शून्य........
तुम्हाला खूप आवडेल.....
:-) तरीही सगळ निष्ठेन करत राहावं हे उत्तम!
ReplyDeleteधन्यवाद सविताजी ! पण मला नक्की नाही समजलं आपण काय म्हणताय!
ReplyDeleteमला 'सविता' म्हणा नुसत!
ReplyDeleteमला म्हणायचं होत की, सगळ शून्य जरी असल तरीसुद्धा समोर असलेले जीवन निष्ठेन काही ना काही करत जगाव .. तशी शून्यावस्था झेपण अवघड असत सामान्य माणसांना नेहमीसाठी इतकच म्हणायचं होत :-)
ओके! सविता!(तुम्ही अनुभवी ब्लॉगर आहात, मला असं नुसतं सविता म्हणायला कसतरी वाटत. आणि तुम्हीही मला तुम्ही म्हणू नका..काही लोकांना नुसतच मोही आवडतं.) शून्यावस्थेत जर सगळं थांबत असेल तर निश्चितच एक नवीन विश्व सुरु होत असेल. कदाचित शून्यावस्था आल्यावर जीवन परिपूर्ण निष्ठेने आपोआप चालत असाव!
ReplyDelete