Wednesday, March 23, 2011

एक कळी पुन्हा बोलली


खूप दिवसांनंतर आपल्याशी बोलतेय. खरंच क्षमस्व. मध्ये जरा बरं नव्हतं आणि बरेच दिवस नेट पण बंद होतं. त्यामुळे बराच वेळ गेला. 


एक कळी पुन्हा बोलली 
लाजता लाजता कळी खुलली 
गुलाबी गुलाबी गालांवर 
लाली आज पुन्हा दिसली 
गोड कळी पुन्हा लाजली 
उमलता उमलता पुन्हा मिटली 
मिटता मिटता पुन्हा उमलली 
गोडी जीवनाची तिला कळली 
ओठी लाली पुन्हा उमटली 
गोड स्मित गोड डोळे 
चुकून गुपित काय बोलले 
प्रेम म्हणे मजला झाले 
वेडे मला 'त्याने' केले 
काय हे 'राधे' तू म्हणालीस 
वेडे तर तू मला केले
ऐक रे 'श्याम' ! प्रेम तुझे 
वेड मजला असे लाविते 
तुझेच गीत गात राहते 
स्वतःलाही मी विसरते 
'श्याम' रे! तू प्राण माझा 
सखा तूच पती माझा 
गोड प्रेम हे राधा बोले 
ऐकता ऐकता मन वेडे होते 
वेडा श्याम वेडी राधा 
प्रेमाची गोडी राधा 
राधेशिवाय प्रेम नं जगती
राधेनेच दिली भक्ती 
प्रेम हीच जीवनाची शक्ती