Sunday, November 20, 2011

हनुमंतस्तोत्र

गोस्वामी तुलसीदासजी विरचित हनुमान चालीसात वर्णिलेली हनुमंतस्तुती मराठीत अभिव्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न.


हनुमानजी महाराज धुळे श्रीराम मंदिर

किती कृपा तव कारुणिक हे हनुमंता
रामभक्त प्रसिद्ध तू हे जगदाधारा
रक्षिसी सदा महादु:खातुनि आर्तभक्तां  
भक्षिसी, विनाशिसी भूत राक्षसां सर्वदा
सदा कृपा तुझी वर्षे आम्हांवर
आश्रितजन आम्ही तव कृपेवर
करुणा तव अनंत अंत करि मम दु:खांचा
कृपा तव अनंत स्वानंद देई अंतरींचा
कर्मे अनंत जन्मांची नाशिसी हे रामदासा
दु:खे – सुखे यांतुनि बंधमुक्त करिसी तू आम्हां
विशुद्ध विमल भक्ती देसी प्रभू श्रीरामांची
शक्ती तनमनाची देसी प्रभु रामकार्यासी
शाश्वत विमल ज्ञान जे दुर्लभ जगती
सहज उदय पावे तेच आज हृदयातुनि
ऐसी कृपा तव सद्गुरुंसम हे रामभक्ता
विमल भक्ती मिळे ज्ञान आम्हां आर्तभक्ता
सुख – दु:खे राग – द्वेष भ्रम केवळ हा अशेष
यांपलीकडे सत्य शाश्वत एक प्रेमधारा
श्रीरामभक्तीचा हृदयातुनी वाही अखंड झरा
सुलभ रामभक्ती केवळ तवकृपेने
योगियांस जी दुर्लभ सहजी मिळे तवकृपेने
हे हनुमंता! अविलंब भेटवी मज श्रीरामा
तवकृपेने अंत होवो आज भवदुःखाचा
तवकृपेने अंत होवो आज भवदुःखाचाहनुमानाजींवरील इंग्रजी लेख गुरुकृपा वर What Can We Learn From Lord Hanumana?