Thursday, September 27, 2012

जीवन हे एक महाकाव्य


हे काव्य माझ्या इंग्रजी काव्याचे 'Epic of The Life' मराठी रूपांतरण आहे. हा एक नवीन प्रयोग आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये भावना अभिव्यक्त करण्याचा आपल्याला नक्कीच भावेल. 

जीवन हे एक मधुर काव्य 
हर क्षण प्रकटे एक श्लोक सुंदर 
घेऊन सवे नव माधुर्य 
प्रकटे एक काव्य मधुर 
भावना त्यांत प्रेम-शांतीच्या 
हृदयातून प्रकटे नव आल्हादच्या

हर श्वास असे उत्सव जीवनाचा 
ईश्वरास समर्पित, प्रेम भक्तीभावाचा 
प्रेमाचे इथे छंद जुळती 
श्लोक मधुर स्मिताचे ओठीं तरलती

नयन गाती गीत यशाचे 
हृदय रचे संगीत प्रेमाचे 
ताल या गीतात 
दिव्य आनंद धरे
आणि ओठांवरती 
हृदयशांती स्मित बनुनी पाझरे 

अध्यात्म होई इथे जीवनाचे महाकाव्य 
नशिबही या तालान्वरच गाई 
असे हे जीवनाचे महाकाव्य 

द्वेष मत्सर वितळे इथे 
प्रेमाच्या दिव्य आनंदसागरी 
आत्म्याचे स्वातंत्र्य प्रकटे 
जणू खग उडे मुक्त आकाशी 

इच्छांचा साऱ्या अंत होई
प्रेमाच्या परीपुर्णतेत 
यश मात्र वर्धिष्णू होई 
प्रेमाच्या छायेगत 

जीवन हे होई दिव्य काव्य 
मधुर पवित्र एक महाकाव्य 
मधुर पवित्र एक महाकाव्य