योद्ध्यांचे राष्ट्र

दिवाळी फटाकेमुक्त साजरी करा म्हणून खूप मोहिमा चालविल्या जातात. चार दिवसांच्या सणाने जणू काही प्रलय येईल इतके प्रदूषण होते अशी सुंदर वातावरणनिर्मिती असते. मला फटाके फोडण्याचे समर्थन करायचे नाही उलट बालकामगार फटाके बनविण्याच्या उद्योगात भरडले जातात, त्यामुळे एकूणच फटाके हा प्रकार मला पटत नाहीच.


पण हेही मनात आल्यावाचून राहत नाही, की पर्यावरणवादी इतर अनेक गोष्टी ज्यामुळे प्रदूषण पसरते त्याचा विरोध का करीत नाही? मी काही या विषयातली तज्ञ नाही, पण गोहत्येमुळे प्रदूषण होत नसावे का? असा प्रश्न नक्कीच पडतो.असो. आजचा विषय थोडा वेगळा आहे. दर दिवाळीत बाजारात खेळण्यातल्या बंदुका मिळतात आणि मुलांना त्या बंदुकांचा आणि ठो ठो करण्याचा इतका आनंद होतो की काय वर्णन करावे! त्यांच्यात एक नवीनच उत्साह आणि स्फुरण चढते Hands Up Hands up असे ओरडत ते चोर पोलीस आणि अजून काय काय खेळ खेळतात. त्यांचा तो इवलासा दारुगोळा लगेच संपतो, पण त्यांचे ठो ठो आणि हात मात्र थांबत नाही. हे सगळे कशाचे लक्षण आहे? प्रत्येकजण योद्धा होऊ शकतो. या मुलांमधला योद्धा अभ्यास - खेळ - क्रिकेट वगैरे यांत शांत दबलेला असतो आणि दिवाळीला ते आपला हा आनंद आणि शौर्य जे प्रत्येक हिंदू च्या रक्तातच आहे ते लपवू शकत नाही. पण जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण त्यांना शिक्षण देतो अहिंसेचे. एका गालात मारली शत्रूने की दुसरा गाल पुढे करायचा. का? हा वेडेपणा नाही का? असे प्रश्न सुद्धा विचारायचे नाहीत. सुदैवाने छत्रपतींच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या या भूमीत अहिंसेचे वेड तसे कमीच आहे. पण आपल्या शिक्षणव्यवस्थेत एकूणच भ्याड आणि असाहाय्य आयुष्य कसे जगावे याचे बाळकडू मिळते. अगदी खोटा इतिहास शिकवून. रक्ताचा एक थेंबही न सांडता मिळालेले अपूर्ण स्वातंत्र्य लहानपणापासून कानी कपाळी ओरडून! 

फटाके, ध्वम (बॉम्ब), रॉकेट वगैरे असे काय काय प्रकार दिवाळीत मिळतात ते सगळे शस्त्रांचेच प्रकार, फक्त सौम्य आणि सण म्हणून उडवले जातात एवढेच. 

यापेक्षा सैन्यात भरती होऊन खरी खरी शस्त्रास्त्रे चालविली तर....

राष्ट्राचे रक्षण करण्याचे आणि योद्धा होण्याचेच बाळकडू मुलांना पाजले तर...

शत्रूचा नि:पात करण्यास्तव संरक्षण दलांत भरती झाले तर .... 

हिंदूंचे सैनिकीकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितले आहे...

आपल्या बुद्धीचे आणि शक्तीचे वर्चस्व जगात प्रस्थापित करायचे ठरविले तर ....

सैन्यात भरती होण्यास अगदी हिंदूद्वेष्टे ही विरोध करू शकणार नाहीत. 

दहशतवाद हा आपली मने भयभीत करण्यासाठी आहे, 

विचार करा,

ज्या राष्ट्रांत प्रत्येकच स्त्री - पुरुष योद्धा असेल तिथे दहशतवाद काय टिकेल? 

२६/११ सारखा हल्ला घडू तरी शकेल का ?  


सैन्यात भरती होण्यासाठी हे संकेतस्थळ कृपया पहा : http://joinindianarmy.nic.in/

पटले तर आपल्या मुलांना योद्धे बनवा. नाही पटले तर.......

आपणच आपल्या मुलात असलेल्या योद्ध्याला दडपून टाकणार  का?  

प्रतिमा सौजन्य : http://joinindianarmy.nic.in/

Comments

 1. vaah kay vegla vichar mandla ahe....ashya angle ni vichar karnarya tumhi pahilyach asnar....

  ReplyDelete
 2. मोहिनी जी आपले विचार मनापसून पटले

  दत्तप्रसाद

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद दत्तप्रसाद जी! :)

   Delete

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........