कविता : प्रेमाचा धागा

काळाबरोबर सगळच
बदलतं  
जग, नाती आणि म्हणूनच जीवनही  

कदाचित तू बदलशील 
कधीतरी 
मीही बदलेन कदाचित 
पण 
आपल्यांत बदलणार नाही
ती आपली मैत्री
प्रेमाचा घट्ट धागा 
काळाबरोबर घट्ट होत जाणारा 
तो  प्रेमाचा धागा
आपल्या 
प्रेमाचा धागा