कविता: तुझ्या प्रेमातच

एक गोड कविता, खूप खूप गोड अशा प्रेमासाठी ...


प्रतिमा: कुंदाचे फुल व कळ्या


तुझ्या स्वप्नांतच हरवूनि जावे
तुझ्या प्रेमातच वेडे व्हावे

क्षणभर ही दुरावा कधी न व्हावा
तव प्रेमातच हा जीव न्हावा

कसे कधी वेड लाविलेस तू मला
तुजसाठीच मम हर श्वास व्हावा

सुखाने न्हाउन तृप्त झाले मी
तुझ्या प्रेमातच मलाही विसरले मी

अबोल तुझे प्रेम अव्यक्त जरीही
या हृदयास कळल्यावाचून न राही, क्षणभरही

तुझे प्रेम ही पूजा मजसाठी
तुझे ध्यान मन क्षणभरही न सोडी


प्रेमाचेच सर्वोच्च रूप म्हणजे भक्ती. जेव्हा प्रेमात फक्त प्रेमच उरते, तेव्हा ती भक्ती होते.

प्रेमावर आणखी काही कविता:


प्रेमफुलं फुलताना
प्रेमाचा धागा
प्रेमतत्त्व तुझे नि माझे