प्रार्थना: नमन तुजला हे गजानना

गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच पाउस ही आला; जणू विघ्नहर्ता गणेशाने दुष्काळाचे विघ्न दूर करण्याचे ठरवलेय. गणेशोत्सव व वातावरणातील आल्हाददायक बदल,मन प्रसन्न करीत आहे. विचारयज्ञमध्ये आजची प्रार्थना भगवान गणेशास. ही प्रार्थना विशेषतः पुण्यातील सारसबागेतील गणपतीसाठी स्फुरली. मंत्रमुग्ध करणारे, मधुर स्मित असलेला गणपती माझी प्रार्थना स्वीकारो. 

Image: Bhagwan Ganapati

प्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा संग्रहातून 




हे विनायका, बुद्धिदायका|
नमन तुजला हे गजानना||



तव कृपा प्राप्त होण्या|
प्रार्थना ही, हे गजानना||

विशुद्ध भावाने भजन व्हावे|
अविचल मनाने भक्तिस अनुभवावे||

नित्य नूतन आराधना व्हावी|
तव पूजेतच मनाने दृढता धरावी||

यशापयशी बुद्धि सदैव स्थिर राहो|
हृदयी विवेक अखंड जागृत राहो||

मानापमानी मन अनासक्त होवो|
ईशभक्तीचीच आसक्ती वाढो||

क्रोध मोहातून मुक्त जीवन व्हावे|
अंत:शांती ने तृप्त मम क्षण व्हावे||

तव कृपा वर्षा जीवनी सदैव राहो|
नित्य दिव्य काव्य सदा स्फुरत राहो||

शब्दांत शक्ती तुझी अपार भरावी|


प्रेरणास्रोत मम काव्यगंगा व्हावी||    

ही प्रार्थना हिंदीत: नमन तुमको हे गजानन 

विचारयज्ञमध्ये गणेशोत्सव विशेष स्तोत्र, प्रार्थना व लेख: