कविता हृदयात वसणारी

काल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता "कविता हृदयात वसणारी" 

Image: Kunda Flowers


मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी


सदाच तुझ्या हृदयी असणारी
शांतपणे मूक
तुझ्यातच
डोळे मिट जरा
ऐकण्या मला

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

तुझ्या विचारांत
तुझ्या कल्पनांत
तुझ्या स्वप्नांत
तुझ्या अनुभवांत
तुझ्या प्रयत्नांत

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

तुझ्या जगात
तुझ्या भावविश्वांत
अस्तित्व माझे
मिट डोळे जरावेळ
ऐक माझा आवाज

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

ऐक तुझ्या भावनांना
स्थिर, अस्थिर
आणि चंचल
ऐक जरावेळ
लक्ष दे त्या छटांकडे
मनाच्या इंद्रधनुकडे
सप्तरंगीच नाही ते केवळ
हजारो अद्वितीय भावनांनी भारलेले
भाव ज्यात दिव्य भरलेले
मी तिथेच आहे
मी त्या सगळ्यांत आहे

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

तुझ्या सुख-दुःखात
तुझ्या वेदनांत
बघ मला
मी तिथेच आहे...
ऐक माझा आवाज
मी तुझ्यातच आहे

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

या अस्थिर जगात
अस्वस्थ मनात
आणि शांत ध्यानातही 
तुझे हृदय आहे कार्यरत
मी श्वास घेते तिथेच

मी कविता
तुझ्या हृदयात वसणारी

ऐक माझा आवाज
आणि लिही आत्ताच
तुझी लेखणी वाट बघतेय
हे जग वाट बघतंय
तुझी
माझी
तुझ्या कवितेची

मी तुझी कविता
हृदयात तुझ्या वसणारी

This poem in other languages:विचारयज्ञामध्ये अन्य कविता: