मन अडखळलं तरी...

अबोल भावना पण कवितेत बोलक्या होतात...

प्रतिमा: रानफूलखूप बोलावसं वाटतं तुझ्याशी
शब्द का थांबतात

कळतंच  नाही
शब्दांना खूप बोलता येतं
पण मनाला नाही येत कधी कधी
मन अडखळतं जेव्हा
शब्द अबोल होतात
खूप बोलायचंय शब्दांना
पण मनाला कसं समजवायचं
डोळे बोलतात मनातलं  गुपित
मन डोळे वाचणारं समोर नसतं
शब्द थांबले, मन अडखळलं
तरी प्रेम बोलतं हृदयाने
भावना स्पर्श करतात हृदयानेच
हृदयाला शब्द नकोत
भावनांना अलंकार नकोत
भावना जगणं
भावना अनुभवणं
हेच अबोल प्रेम
अबोल मनातलं अबोल प्रेम

विचारयज्ञमध्ये भावस्पर्शी कविता: