कविता: वेदना

माझेच होते आकाश माझेच ते आहे
माझेच होते पंख मजपाशीच आहेत
विसरूनि स्वतः स उडायचे विसरले
माझेच स्वप्न जगायचे होते विसरले
माझीच कथा लिहिणार कोण आणि?
माझीच आहे वेदना जाणणार कोण आणि?
वेदनेतच पंख आहेत माझे
वेदनाच प्रेरणा भरारीस
वेदनाच फुंकर जखमेची
वेदनाच आशा* जगण्याची
वेदनाच साक्ष आहे वेदनेची
वेदनाच वाट** आहे मुक्तीची

*वेदना आहे, दुःख आहे, भावना आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. जीवन आहे तर आशा आहे. मृत व्यक्तीला दुःख नसते आणि जीवन पण. संवेदनाहीन जीवन मृत जीवनच असते.

**दुःख आहेत म्हणून बद्ध असण्याचे स्मरण असते आणि म्हणूनच मुक्तीची ओढ पण असते.




विचारयज्ञात अन्य कविता: