Wednesday, January 26, 2011

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - वंदे मातरम !

|| श्री श्री गुरवे नम: ||


स्वप्न सगळेच बघतात ,
स्वत:साठी इतरांसाठी !
आपण आज एक स्वप्न बघू या ;
देशासाठी, आपल्या सर्वांसाठी !


'सुरक्षित भारत '

'सुविकसित   भारत' 


भारताच्या  विकासासाठी
 झटतोय आपण सगळे 

पण सुरक्षेशिवय विकास 


म्हणजे


 प्राणाशिवाय  श्रृंगारित देह!

आज निश्चय करू या 
आता झटायचे सुरक्षेसाठीपण! 
  
हे देवतांचे राष्ट्र
 पीडितांचे  राष्ट्र होऊ नये

म्हणून 

हे प्रेषिताचे  राष्ट्र 
शोषितांचे राष्ट्र होऊ नये 

म्हणून  

आचंद्रसूर्य भारताचे 
स्वातंत्र्य नान्दावे 

म्हणून 

निश्चय करू या 

एकतेचा! सुरक्षेचा !! सुविकासाचा!!!


त्याग करू या

राष्ट्रद्रोह्यांचा ! विघातकांचा !! भोगवादाचा !!! 


जय हिंद