सिद्धयोग ( महायोग ) - २

आज देवदीपावली! आजच्या दिवशी माझे सद्गुरुदेव परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांना त्यांचे सद्गुरू परमहंस परीव्राजकाचार्य १००८  श्री लोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांनी शक्तिपात अर्थात सिद्धायोगाची दीक्षा दिली. आणि आज तो सिद्धायोगाचा सूर्य विश्वबंधुत्वाचा प्रकाश आणि आल्हाद सद्गुरुमाउली नारायणकाकांच्या रूपाने सर्व जगास परम शांती प्रदान करतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो 'मार्तंड जे तापहीन' म्हणून वर्णिला आहे, 'असा हा' तापहीन सूर्य उगवता झाला, आजच्याच मंगल, पावन दिवशी! हो! दीक्षा म्हणजे शिष्याचा नवीन जन्मच! म्हणून तर आपण सद्गुरूंना माउली म्हणतो. हे काका महाराजांनी आपल्या सिद्धयोग ( महायोग ) या पुस्तकात म्हटले आहे.

माझ्यासारख्या अनंत शिष्यांना घरबसल्या सिद्धायोगाचे जे अमृत प्राप्त झाले, त्याची सुरुवात एक प्रकारे याच दिवशी झाली.

सिद्धयोग दीक्षा प्राप्त होण्यासाठी काही नियम पालन करण्याची तयारी असावी लागते. इच्छा असूनही काही कारणांनी लोक दीक्षा घेत नाही. त्या सर्वांचीही सर्वोच्च दिक्षेसाठी आपोआप तयारी सुरु व्हावी म्हणून काका महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभासाचा राजमार्ग सर्वांसाठी प्रशस्त केलेला आह. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही  अगदी हृदयापासून आपणा सर्वांना प्रार्थना आहे.

ह्या विश्वरूपी बागेतली अनंत फुले म्हणजे आपण सगळे! सिद्धयोग, पूर्वाभ्यास आणि Universal Brotherhood Day मुळे आपले आयुष्य असेच उमलते आहे, आनंन्दाने डोलते आहे. दुरवर दृष्टी टाकल्यास ही फुले अनंत होत जातात आणि अधिकच जवळ आलेली दिसत आहेत ते विश्वबंधुत्वामुळे!

सगळे भेदभाव मनातून दूर होऊन सनातन भारताची जगास देणगी असलेली संकल्पना "वसुधैव कुटुंबकम"  सगळं विश्वच आमचं घर, सिद्धयोगामुळे सहज मूर्त  होत आहे. 



ह्या लेखमालिकेतून यापुढे आपण सिद्धयोग व पूर्वाभ्यास याबद्दल अधिक जाणून घेऊ.


या लेख मालिकेचे आधीचे भाग :


देव दीपावली बद्दल अधिक जाणून घ्यायचेय?