Friday, December 17, 2010

अक्षय पात्र फौंडेशन - आता पोटभर अभ्यास!

पोटभर अभ्यास ? एवढा अभ्यास कुणाला आवडेल?

गमतीचा भाग जाऊ द्या ! पण एक प्रश्न आहे - उपाशीपोटी अभ्यास कसा करणार ? आणि लहान मुलांना पोटभर खायला लावणं म्हणजे एक दिव्यच!

हे आवडत नाही, ते आवडत नाही !

आपण समजू शकतो, कुपोषणाने मुलांच्या वाढीवर काय परिणाम होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक विकास कसा नष्ट होऊ शकतो. मग शिक्षण आणि त्यांच्या भवितव्याचं  काय होईल!

आज भारतात अशी अनेक खेडी आहेत. लाखो- करोडो लोक आहेत, त्यांना पोटभर जेवण मिळतच नाही! अशी अनेक खेडी आहेत, जिथे अजूनही दोन वेळचे काय पण एक वेळचे ही पोटभर जेवण दुरापास्त आहे.


 ३-४ वर्षांचा मुलगा उपाशी ! सतत उपाशी ! 

त्याला कळेल का शाळा म्हणजे काय ते ?

अभ्यास म्हणजे काय ते ?

सकाळी सकाळी शाळेचा गणवेश घालून, आईने छान भांग पाडून आणि शाळेचा डबा घेऊन निघालेली मुले किती गोड दृश्य !

आणि

आंघोळ नाही, धड जेवण नाही ! कुठेतरी उघड्यावर एका खोलीची शाळा ! ती पण अस्वच्छ ! मी अशी दृश्य प्रत्यक्ष पाहिली आहेत.

कस वाटतं ? बघायची पण इच्छा होणार नाही

भारत आणि इंडिया यातली ही दरी वाढतेच आहे. आश्चर्य म्हणजे इतक्या लांब लांब च्या खेड्यांवर जर काही एक सुलभ असेल तर ते म्हणजे चित्रपट संगीत आणि मोबाईल !

सकारात्मक दृष्टीने बघितल तर जसं आकर्षण  आणि वेड चित्रपटांनी निर्माण केलय, ते जर ठरवल तर चांगल्या कामासाठी निर्माण करता येईल, माहितीचा विस्फोट -विकासाचा विस्फोट घडवून आणू शकेल !


बस!  इच्छा - एकता - आणि वास्तवात कार्य ! 

कुठलीही सामाजिक समस्या मुळापासून नष्ट होऊ शकेल.

बघा! कुणीतरी सुरुवात केलीय !


आपण त्यांच्यात सामील व्हायचं का?

चला तर मग!

अक्षय पात्र फौंडेशन  -

जून २००० पासून १५०० मुलाना ५ शाळांमध्ये जेवण जाऊ लागले.

आता १२ लाख पेक्षा जास्त मुलांपर्यंत हे भोजन जात आहे. याची विस्तृत माहिती - अक्षय पात्र फौंडेशन  या संकेत स्थळावर मिळेलच. इथे मला काय हृदयाला स्पर्शून गेलं ते फक्त सांगते -

छान स्वयंपाक करून पोटभर जेवण वाढण्यासारखा आनंद कदाचितच दुसरा कुठला असेल !

त्यातून जर लहान मुलं जेवणार असतील तर 'आनंदाचे डोही आनंद तरंग!' मुलं आणि आई दोघांनाही !

अक्षय पात्र  ने केंद्रीभूत स्वयंपाकघरे बनवली, जी अत्यंत स्वच्छ असतात, इथे शुद्ध, स्वच्छ आणि सकस स्वयंपाक बनवला जातो. सगळं यंत्रांद्वारे ! याने इंधन तर खुपच वाचत पण हे आर्थिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आणि पर्यावरणासाठीही फायदेशीर! हे सुग्रास भोजन नंतर पाठवलं जातं, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये, छोट्या छोट्या मुलांसाठी !

अक्षय पात्र च्या या योजनेबद्दल वेगवेगळे अहवाल आणि निष्कर्ष जे सांगतात, ते आश्चर्यकारक आहे -

शाळेत प्रवेश घेण्यामध्ये खूप वाढ -विशेषत : खेड्यांमध्ये !


मुलांच्या उपस्थितीत वाढ !


अर्थातच अभ्यासात मन लागण आणि अभ्यासात गुणात्मक वृद्धी !


आरोग्यात सुधारणा !


पोटभर जेवण आणि पोटभर अभ्यास !


हे सगळं आपण आपल्या बाळाच्या अनुभवावरून समजू शकतो . त्याच्या खाण्यात होणारे बदल आणि त्याचे परिणाम ! प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणं आणि त्याची स्थिती सुधारण आपल्याला शक्य नाही ............

पण आपल्या लेकरासारखच जेवण लाखो मुलांना मिळू शकतं - आपला थोडासा सहभाग खूप मोठा परिणाम साधणारा आहे -


आंतरजालीय ( ONLINE ) देणगी देण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लीक करा

Akshay Patra Online Donations 


IndiVine वर या लेखास मत देऊन कृपया प्रोत्साहित करावे , ही कळकळीची प्रार्थना ( स्पर्धेसाठी नाही 
तर हा संदेश सगळीकडे  पोहोचावा म्हणून )


एका छोट्याश्या लेखाच्या माद्ध्यमातून ५० बालकांना भोजन देण्याची, सुवर्णसंधी आणि हेच मोठ्ठे पारितोषिक दिल्याबद्दल Indiblogger.in आणि अक्षय पात्र फौंडेशन  ला करोडो करोडो नमन!


याच विषयावर वेगळ्या इंग्रजी लेखासाठी कृपया इथे क्लीक करावे 


Gurukripa Indian Culture 'N' Philosophy 

याच विषयावर वेगळ्या हिंदी लेखासाठी कृपया इथे क्लीक करावे  

चैतन्यपूजा 

धन्यवाद खूप खूप !