निसर्गचक्र आणि कर्म सिद्धांत

निसर्गचक्र आपण नाकारू शकत नाही किम्बहुना आपण ते प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. ऊन - पाउस अणि हवामानात होणारे सगळे बदल.......आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. 

आपण ईश्वराचे अस्तित्व मानू वा न मानू , पण निसर्ग चक्राला आव्हान देणे अशक्य. केवळ अशक्य!!

आपले जीवन जर निसर्गाबाहेर असू शकत नाही, तर आपली कर्मे कशी असतील!

कर्मसिद्धांतानुसार आपल्याला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागणार, शुभ असो वा अशुभ.मुद्दाम केलेले असो वा चुकून घडलेले. पण ते निसर्गात जी स्पंदने निर्माण करते, तीच आपल्याकडे परत नाही का येणार? 

हा सिद्धांत व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनातही लागू आहे. आणि या निसर्गचक्रापासून कुणी स्वत:ला अलिप्त ठेवू शकत नाही. 

हा फक्त आध्यात्मिक सिद्धांत म्हणून विचारणीय नाही तर सामाजिक प्रश्न, राष्ट्रापुढील समस्या, त्यांची कारणे हे जाणण्यासाठी हि अतिशय आवश्यक आहे. हा सिद्धांत आपण स्वीकारला तरच समस्या समूळ उलगडतील आणि सुटतील हि.  

कुणी सत्ताधारी - तो केवळ सत्ताधारी आहे म्हणून किंवा VIP - अति महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे म्हणून जनतेवर अनन्वित अत्याचार करून त्या कर्मांपासून सुटू शकत नाही. 

कर्म सिद्धांत नैतिकतेचे मूळ आहे. नैतिकता शिकवून नाही तर स्वाभाविक असावी. एकदा आपली निसर्गाच्या शक्तीबद्दल खात्री झाली, कि आपल्याला प्रत्येक कर्म करताना याचे भान राहील कि हे माझ्याकडे परत येईल.

स्वामी विवेकानंदाचे अमृतमयी दिव्य विचार आणि सतत सुरु असणारे विचार मंथन, हजारो प्रश्न - उत्तरे , या सगळ्यातून ईश्वराच्या कृपेने मला हे अमृत गवसले.....आपल्याला या विचारांबद्दल काय वाटते?

Comments