माझे सद्गुरुदेव परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराज योगमय तपस्वी जीवनाची ८५ वर्ष येत्या ४ जुलैला पूर्ण करीत आहेत. महायोगाबद्दल माहिती अधिकृत संकेतस्थळावर mahayoga.org वर अवश्य बघावी
माझे ब्लॉग्स सद्गुरुदेवांनाच समर्पित आहेत.
या दिव्य आनंदानिमित्त श्री सद्गुरुदेवांना अर्पित हे काव्य .......
मन प्रसन्न झाले आज
राघव पुन्हा भेटला आज
गोडी जीवनाची परतली आज
कसा गवसला हा आनंद
कशी गवसली हि जादू
मनी भावला मज राघव
त्याच्या प्रेमाची ही जादू
वेड त्याने मज लाविले
प्रेमात त्याच्या मज बांधिले
मन माझे त्याने असे चोरिले
हृदय राघव राघव बोलिले
किती गोड हे 'राघव' नाम
सद्गुरुराये मज दिधले
गोड झाला हर श्वास आज
नामामृताचे पान करुनी
राम नाम हे अमृत साच
दिले सद्गुरुरायांनी
आनंद हा राम नामाचा
प्रेम हे श्रीरामाचे
गुरुकृपे मज प्राप्त झाले
जे दुर्लभ या संसारी
संसार काय, संन्यास काय
जीवन केवळ राममय झाले
राम दिसे दाही दिशांना
प्रेम हृदयी पूर्ण भरले
योग तिन्ही आज एक झाले
अद्वैताचे ज्ञान प्रकटले
गुरुरायांनी जीवन हे
धन्य धन्य केले
धन्य धन्य केले
हाच भाव असलेली माझी हिंदी कविता जीवनकाव्य बना चैतन्यपुजा अवश्य बघावी ! :)
Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........