राष्ट्रभक्ती - हा एक अपराध आहे का ?

काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाचे मुद्दे नुसते बोलले तरी तो अपराध समजला जायचा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण धर्मनिरपेक्षता असं नुसतं म्हटलं तरी सर्वज्ञ झालोत.

पण आता, राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलायचं तर तो पण अपराध झाला आहे, विशेष म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणारेच दुसऱ्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे कायद्याच्या मर्यादेत आहे, नाकारतात.

या लोकांची निष्ठा खरंच कुठे आहे, हा प्रश्न आहे.


कुणाला राष्ट्रासाठी चीड आली, तर हे लगेच त्यांना गप्प करायला सरसावतात. संवाद पण शक्य नाही. आपले म्हणणे चुकीचे आहे, हे सिद्ध होऊ लागले की हेच अहिंसावादी लोक रागावतात.

हेच दृश्य वारंवार दिसते. बऱ्याचदा वाटते, आपणच गप्प बसावं. कधी कधी वाटते, किती मुर्खपणा ऐकणार? पण बोलूनही उपयोग नाही.

खरंच हे सगळं मुळापासूनच बदललं पाहिजे. लहानपणापासून देशभक्तीचे धडे मिळाले तर पुढे देशभक्ती अपराध ठरणार नाही.

Comments