दीपावलीचा विचारयज्ञ



आज विचारयज्ञाचा आरंभ होऊन एक वर्ष पूर्ण झाले. आज दीपावलीचा आनंद द्विगुणीत करणारा हा दिवस. गुरुकृपा ब्लॉग सुरु केल्यावर मराठी आणि इंग्रजी एकाच ब्लॉग वर लिहायचे, पण नंतर वाटलं मराठी स्वतंत्र ब्लॉग असलेलाच छान होईल. केवळ मराठी वाचायचे आणि केवळ मराठी लिहायचे असं पूर्ण मराठी ब्लॉग. मला ब्लॉगींग मध्ये सगळ्यात पहिली आणि जिवाभावाची सखी भेटली, ती कांचनताई!कांचनताईंची वेगळी ओळख लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही.


ब्लोग्गिंग विश्वात आल्यावर काहीही व्यक्तिगत परिचय नसताना कांचनताईंनी मला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत मदत केली, अगदी दिवाळीतसुद्धा मागच्या वर्षी  रात्री उशिरापर्यंत त्या माझ्या छोट्याशा नव्याब्लॉग साठी मला मदत करत होत्या. त्यांची मैत्री आणि सगळ्यांना मदत करण्याचा सहज स्वभाव असल्याने त्यांना धन्यवाद देऊन मी मैत्रीत औपचारिकता आणणार नाही.

त्यानंतर श्री. विनायक रानडे सर यांचा परिचय असाच अविस्मरणीय. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने माझ्या राजकीय विषयांसंबंधी आणि खरं म्हणजे कुठल्याही विषयासंबंधी, ज्ञान आणि विचारप्रक्रियेला नवीन आयाम प्राप्त झाले. सखोल विचार कसा करावा, आपल्याला जे दिसतं त्यापेक्षा सत्य किती वेगळे असू शकते, गंभीर राजकीय मुद्द्यांवर लिहिताना कुठली काळजी घ्यायला हवी, हे मला त्यांच्या मार्गदर्शनाने  कळले. त्यांचे ब्लॉग तर सर्वांसाठीच प्रेरणादायक आहेत. दरवेळी नवीन काहीतरी शिकायला मिळते.

ब्लॉगींग  मध्येच मीमराठी ची सदस्य झाले. मीमराठीकरांकडून स्नेहआणि खूप प्रोत्साहन मिळाले, विशेषत: श्री अमोलजी देशमुख, श्री रणजीतजी चितळे, श्री गब्बरसिंग  यांचे प्रोत्साहन अविस्मरणीय आहे.

विचारयज्ञ अविरत चालू ठेवण्यास प्रेम, सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही, पण ते अविस्मरणीय क्षण माझ्या हृदयात साठवलेले आहेत आणि आज माझ्या भावना काय आहेत हे शब्दांत मांडणे पण मला अशक्य झाले आहे. आपले प्रेम व प्रोत्साहन असेच राहू द्यावे, आपल्यारूपाने गृकृपेचाच अनुभव मिळत आहे. काही चुकले असेल, तर हक्काने सांगावे. आपल्या ऋणातून मुक्त होणे तर शक्य नाही, पण अधिक मनापासून आणि नियमितपणे लिहिण्याचा प्रयत्न अवश्य करेन, हेच मी करू शकते.

दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्ञाननेत्ररुपी दीप प्रज्वलीत करणारी ही दीपावली आपणांस व मलाही ठरो, हीच परम पूज्य सद्गुरूमाउलींच्या चरणकमली प्रार्थना. विचारयज्ञ अखिल विश्वात, प्रत्येक हृदयात अखंड सुरु राहो. सनातन संस्कृतीचा हा विचारयज्ञ सर्व मानवजातीस प्रेम, शांती आणि परमानंद देणारा ठरो....

दीपावली  विशेष माझ्या हिंदी ब्लॉग चैतन्यपुजा व इंग्रजी ब्लॉग गुरुकृपा वर....

श्री  विनायक रानडे सरांची ही भेट ...दीपावली चा आनंद द्विगुणीत करणारी ही सुंदर भेट....



Comments