स्वामी विवेकानंद - 'ज्ञानप्रकाश'




स्वामीजी! आपण ज्ञानप्रकाश आहात. ज्ञानसूर्य नाही तर केवळ प्रकाश!
जिथे केवळ प्रकाश असतो ते परमधाम या पृथ्वीवर आले विवेकाचे – आनंदाचे स्वामी बनून!
आपण या विश्वास अंधारातून ज्ञानाच्या सनातन वैदिक धर्माच्या, अद्वैताच्या प्रकाशात अक्षरशः प्रकाशच बनविले.
आपण या भौतिक जगास जे भौतिक वासना इच्छांच्या मागे वेडे झाले होते, अविचल शांती प्रदान केली.
त्या पूर्वेकडील जगास जे आनंदाचा सागर असलेले अद्वैत विसरून निराशेच्या गर्तेत फसले होते,
त्या पश्चिमी जगास जे आधुनिकतेच्या भ्रमाने अंधारात चाचपडत होते.
त्या पूर्वी जगास जे ज्ञानी होते परंतु अंधश्रद्धांच्या जाळ्यात फसले होते.
आपण अनंत त्याग केला...
खूप छळ सहन केला...स्वकीयांकडून आणि परकियांकडून ही!
पण आपल्याला काय स्वकीय आणि परकीय!
आपण तर वैश्विक बंधुभाव जगलात!
आपल्याला तर सर्व बंधू आणि भगिनी!
आपण प्रेम, शांती आणि अद्वैत यासाठीच जगलात,
आपले डोळे म्हणजे मूर्तिमंत प्रेम – मूर्तिमंत शांती...
शांतीचा – प्रेमाचा अखंड स्रोतच ...झराच!
आपण कधीही थकला नाहीत!
कधीही थांबला नाहीत!
कधी विश्रांती, कधी प्रकृतीचा विचारही केला नाही!
आपण अविश्रांत या विश्वास विश्रांती देत फिरलात ...अजूनही देत आहात!
आपली अमृतवाणी ...माणसास देव बनवीत आहे!
विकारांस शांती बनवीत आहे!
आपण अनंत वेदना सहन केल्यात ...या विश्वाची या मानवतेची वेदना मिटवण्यासाठी!


गरीबी, अश्रू
भ्रम, भीती
आपण सगळ्या समस्यांची उत्तरे दिलीत!
उत्तरेच नाहीत तर,...., आत्मिक शांती आपल्या अमृतवाणीने दिली!
प्रकाश प्रकाश केवळ चिरकाल प्रकाश!
सगळे विश्व आपल्या प्रकाशमयी वाणीने उजळून टाकले!
आपण सगळ्या दु:खांचा आणि अगदी मनाचाच अंत केलात!
आपण मला दुर्बळ राहू दिले नाहीत,
सगळे भ्रम मिटवलेत आणि शक्तीचे स्वरूपच बनविले.
आपण सदाच माझे पथप्रदर्शक राहिलात!
एखाद्या खऱ्या ....अगदी खऱ्या मित्राप्रमाणे!
मला या भौतिक जगाची या भ्रमजालाची, या माये ची खूप भीती वाटायची.
अनंत भौतिक इच्छा, मुर्ख वासनांचे व्यसन.खूप भीती वाटायची!
मी या भौतिक जगाच्या जंजाळातून दूर पळून आले
आणि
आपल्याला भेटले!
आपली भेट होत राहिली पुन्हा पुन्हा!
आपली चिरंतन अमृतवाणी या विश्वाचा प्राण, या विश्वाचा आधार आहे!
जिथे अध्यात्म हा व्यवसाय होता, पैसे अजून पैसे कमविण्याचा एक धंदा होता,
तिथे आपण – एका अग्नीसम तेजस्वी तपस्व्याने – संन्याशाने असहाय, निराश, उध्वस्त जीवांचा उद्धार केला, त्यांना अद्वैताचे – गहन अद्वैताचे अमृतपान करविले अगदी सहज ....स्वत: कष्ट सोसून.
त्यांनी आपल्याला फसविले ही,
पण आपण आपले नि:स्वार्थ अमृतपान थांबविले नाही.
आपण मला कर्मयोग शिकविला...
नि:स्वार्थ कर्मचा महान योग.
गीतेत भगवंतांनी सांगितलेला महान योग.
आपण मला भक्तीमार्ग शिकविला
शाश्वत – चिरंतन प्रेम...कृष्णावर!
भक्तीयोग – प्रेमयोग!
आपण मला ज्ञानयोग शिकविला!
सर्वोच्च सनातन ज्ञान अद्वैताचे अमृत पान!   
आपण माझे सर्व प्रश्न नष्ट केलेत!
आपली दिव्य वाणी, आपली दिव्य प्रवचने!
ज्ञानाचा दिव्य प्रकाश! केवळ प्रकाश!
शतकानुशतके ...युगानुयुगे!
आपल्याला काळाचे ते कसले बंधन!
काळालाही गुलाम बनविणारी आपली दिव्य वाणी!
आपण खरोखर कालातीत आहात!
आपले विचार – आपले शब्द म्हणजे आशीर्वादच!
दिव्य भव्य आशीर्वाद सत्य सनातन अद्वैताचे मूर्त आशीर्वाद.
आपली दिव्य वाणी म्हणजे आपलेच रूप!
आपली दिव्यं वाणी मज सदा आशीर्वाद देणारी!
आपले प्रेमपुरीत नेत्र,
विश्वास्तव अखंड प्रेम...अमृत...शांती!
आपण नि:स्वार्थ खरे सन्यासी!
आपण खरे योद्धे!
आपण दीपस्तंभ या भवसागरात!
आपण खरे मित्र!
आपण कोण आहात?
स्वामीजी! आपण खरेच कोण आहात?
आपण किती दुःख भोगलीत,
पण कधीही थांबला नाहीत.
आपण मार्गारेटला दिव्यं बनविलेत, पूर्ण बनविलेत!
भगिनी निवेदिता बनविलेत!
त्या या भारतमातेच्या भक्त झाल्या!
मला आशीर्वाद द्या!
माझा हर श्वास माझ्या मातृभूमी साठी!
माझ्या राष्ट्रासाठी!
मानवतेसाठी!
शांतीसाठी, प्रेमासाठी आणि अद्वैतासाठी!
या अद्वैताने मला वेडच लावलेय हो!
आता आपल्या बांधवांचे अश्रू बघवले जात नाहीत!
आपण साक्षात गुरुमाउली आहात!
मी आपले लहान बाळच नाही का?
मी ज्ञानी नाही,
मी योगी नाही,
मी भक्तही नाही!
मी खरंच काहीही नाही!
आपण आशीर्वाद दिलेत तर,
हा भौतिक देह,
ही मोहिनी
अद्वैताचे अमृत साऱ्या विश्वात पुन्हा एकदा पसरवू शकेल.
मी काही महान सन्यासी होऊ शकत नाही!
मला आशीर्वाद द्या!
जसे माताजी आपल्याला सर्वांना द्यायच्या! देत आहेत!
आपण आशीर्वाद द्याल ना?
आपल्याला आठवतेय?
वेडी मी! आपल्याला माहित नाही असे ते काय!
मी तासन्तास आपल्याला बघत बसायचे!
ज्ञान, विवेक आणि विशुद्धता अनुभविण्यासाठी!
सर्व इच्छांतून मुक्त होण्यासाठी! सहज!
आपले दिव्य दर्शनच तसे आहे!
आता हे लिहिताना,
आपले तेच दिव्यं दर्शन अचानक प्राप्त झाले
आणि जीवन धन्य झालेलेच आहे, याचा अनुभव आला!
या  भौतिक जगाच्या जंजाळात मी फसले होते.
मी या सगळ्यांतून वाचले आणि मी जिंकले केवळ आपल्याचमुळे!
मी खोट्या अध्यात्माच्या भ्रमातून वाचले!
आणि सगळ्याचं भ्रमातून मुक्त झाले.
कधी कधी मला आपला रागही यायचा,
माझा छोटासा मेंदू आपले गहन ज्ञान कसे बरे समजणार?
आपल्याला माहित आहे, आपल्यावर माझी श्रद्धा ....
कुठल्या शब्दांत व्यक्त करू!
 
आपण नेहमी एका खऱ्या मित्राप्रमाणे माझ्याशी बोललात,
आपले शब्द शाश्वत आहेत...कालातीत आहेत, आपले विचार सदाच आहेत.
या मानवतेस आशीर्वाद आपली अमृतमयी दिव्य वाणी!
आता पुन्हा इतक्या वर्षानंतर आपले तेच दिव्य दर्शन ...
पुन्हा डोळ्यांत अश्रू दाटून आलेत.
आपल्याला काय सांगावे, आपण तर सर्वच जाणता!
आता मी पूर्ण झाले!
घाबरलेले नाही, गोंधळलेले नाही,
आणि
रडतही नाही!
हे अश्रू त्या जीवनमुक्तीचे आहेत  
जी आज सहज आहे.
हा दिव्य भाव सर्व भावांच्या पलीकडला!
आपले दिव्य शब्द खरे झालेत!
जो प्रकाश मी बाहेर शोधला, बाहेर पाहिला
तो माझ्यातच होता...
सदाच!
त्या महान आत्मज्ञानापासून मी भिन्न नाही!
मी भक्तीपासून भिन्न नाही!
कर्म करता करता कर्मात ‘मी’ केव्हा विरून गेला कळलेच नाही.
आता मी पूर्ण झाले...
बस् मी पुर्णच होते हे मला समजले
सगळे अध्यात्म मार्ग, सगळे योग आता ‘एक’ झालेत!
योग म्हणजे अद्वैत ...
योगाची पूर्ण प्राप्ती अद्वैत
योग तो ‘समाधी’
अद्वैत – ते एकत्व प्रकटले
पण
द्वैत होतेच कुठे ?
सगळेच संपले
आणि
तरीही सगळे नियतीच्या निश्चित गती ने घडत आहे...
इथे काहीही नाही,
तरी सगळे इथेच आहे
अहंकार, मी, तू भेद
सगळे इथेच आहे
तरीही इथे काहीही नाही
आपल्याला खूप आनंद वाटला असेल ...
हे लहान निरागस बाळ,
आपल्याला शोधायचे आपल्या शब्दांत
आणि
आपण मला सगळी उत्तरे द्यायचा...
त्यावेळी मी वाचायचे
आणि
आता लिहिते आहे
काहीही बदलले नाही,
तरी सगळे बदलले आहे
अद्वैताचा प्रकाश पसरतो आहे...
चिरंतन प्रेम, ज्ञान आणि सत्य
अद्वैत – एकत्व
ह्या अनुदिनीचे नवीन पान सुरु झाले ...
जेव्हा सगळे संपले...


इंग्रजी भाव : Swami Vivekanand - The Light of Gyana


Comments

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........