नववर्ष हे आनंदाचे


गुढीपाडव्याच्या – या सुंदर नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे नव वर्ष आपणां सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, अत्यंत आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचे जाओ ही ईश्वरास प्रार्थना. 

घरचा फोटो, गुढी उभारलेला

नववर्षाच्या स्वागतासाठी एक छोटीशी कविता,




नववर्ष हे आनंदाचे
पवित्र पवित्र गोड प्रेमाचे
क्षण हे नव आशा दिशांचे
क्षण येतील स्वप्ने साकारण्याचे
नवीन स्वप्न तरळतील
नव चैतन्याने मन हे पुन्हा
आनंदाने बहरूनि जाईल
धरा ही जशी पुन्हा बहरतेय
नव मोहोर नव पालवीने
तशीच जीवने – नाती – मने


 कडीपत्ता मोहरलेला 

फुलतील प्रेममोहराने
नव पालवी चैतन्याची
पुन्हा जन्मेल नव आशांची
नववर्ष हे आनंदाचे
पवित्र पवित्र गोड प्रेमाचे
पक्षी गातील नवगीत प्रेमाचे
नवसृजनाच्या नवआनंदाचे 
प्रतीक नवजीवनाचे 
सृष्टीच्या नवसौंदर्याचे 

कला नवीन, विचार नवीन
तत्त्व तेच, अभिव्यक्ती नवीन
तत्त्व तेच अद्वैताचे
तत्त्व तेच मानवतेचे
शाश्वत सत्य सहज जगण्याचे

परमानंदात मन रमण्याचे
नव वर्ष हे नव जीवनाचे
नववर्ष हे नव जीवनाचे

नववर्षाचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या आणखी कविता :  


इंग्रजी ब्लॉग गुरुकृपा वर First Day of The Universe
आणि चैतन्यपूजा वर : नवचैतन्यसे सजा आज संसार

Comments

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........