हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
स्वातंत्र्यवीर सावरकर खरे - प्रामाणिक हिंदुत्ववादी नेता.
हिंदुत्ववादी म्हणजे कुणावर अन्याय करणारा नाही. सावरकरांचे विचार हे प्रज्वलित अग्नीसमान धगधगते आहेत, राष्ट्राच्या हितासाठी. तरीही शांती प्रेम आणि समानता यांनी हे सजलेले आहेत. जन्मठेपेदरम्यान ज्या सुधारणा स्वातंत्र्यवीरांनी घडवून आणल्या त्याचा फायदा मुस्लिमांनाही झालाच होता.
सावरकरांचे विचार वास्तवाला धरून आणि यथार्थ होते आणि आजही आहेत. सावरकरांनी तुच्छ तुष्टीकरणाचे राजकारण कधीच केले नाही. त्यांचे विचार, साहस, निर्णय आणि कृती या नेहमीच धाडसी होत्या.
आता राष्ट्रद्रोह्यांची संख्या खूप वाढली ...त्यांच्याशिवाय - त्यांच्या मतांशिवाय आपले कसे होणार? अशी पराभूत मानसिकता आजच्या नेत्यामध्ये दिसतेय. त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांचे धोरण हे शरणागतीचे आहे. अगदी अमर जवान ज्योती वर जेहादी हल्ला झाला तरी शरणागतीच्या राजकारणाचा अंत दिसत नाही.
आचारामध्ये प्रामाणिकता आणि शुद्धता असल्यास राष्ट्राच्या हितासाठी कठोर निर्णय घेता येतात. पण आचार विचार भ्रष्ट. ध्येयामध्ये राष्ट्रहित नसून मतांसाठी स्वार्थी राजकारण आणि वाट्टेल ते करून सत्तेचा लोभ असे दोष आताच्या राजकारण्यांमध्ये अगदी आतपर्यंत भिनले आहेत, त्यामुळे सावरकरांसारखे धैर्य आणि तेज कुठे दिसत नाही.
कुठे 'याल तर तुमच्यासह' अशी गर्जना करणारा सिंह आणि कुठे 'त्यांच्या मतांशिवाय सत्ता मिळणे शक्य नाही म्हणून तुष्टीकरण केलेच पाहिजे' असे म्हणणारे आजचे सत्ताधारी आणि विपक्ष सुद्धा.
सावरकरांसारखे तेज हवे असेल तर प्रथम आचरण शुद्ध - ध्येय प्रामाणिक आणि राष्ट्रनिष्ठा प्रामाणिक हवी.
आपली राष्ट्रनिष्ठा प्रामाणिक असती तर आपण राष्ट्राच्या सुरक्षेच्या चिंतेने उद्विग्न झालो असतो, पण आपण म्हणतो - किंवा म्हणायला भाग पाडले जातो - देशाला राममंदिराची नाही विकासाची गरज आहे, मग काय तर विकास नाही भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची गरज आहे आणि मग काय तर विसरा आतंकवाद आणि करा अमन की आशा.....आपण स्वत:लाही फसवतोय आणि राष्ट्रालाही.
आपण आताच्या परिस्थितीत काय करायला हवे आणि राष्ट्रासमोर मुख्य समस्या काय आहे, हे कुणालाही समजावून सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते तर त्यांनी काय केले असते हे पण आपण समजू शकतो.
आज गरज आहे, थोडे प्रामाणिक होण्याची स्वत:ची आणि राष्ट्राची फसवणूक थांबविण्याची....
अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी सगळे भेद विसरून - सगळे अगदी सगळे भेद, जातीय भेद - पांथिक भेद विसरून एकत्र येण्याची. राष्ट्राची सुरक्षा हिंदुत्वातच आहे. जय हिंदुराष्ट्र.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित एक इंग्रजी काव्य - काव्यसंग्रहातून :
We need you Savarkar Once Again...या काव्याला ८६ शेयर फेसबुक वर मिळाले त्यावरून सावरकरनिष्ठा आजच्या तरुण पिढीत किती प्रभावी ठरलीय हे सुचिन्ह दिसते...:)

Comments
Post a Comment
हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........