संकल्पपुर्तीस्तव प्राणपूजा

नवीन वर्षाच्या संकल्पपूर्तीसाठी काही विचार आपल्या फेसबुक पानावरून :

नवीन वर्षाच्या सुरुवातीला बहुतेक सगळे काही नवीन संकल्प करतात. ख्रिस्ती दिनमान इथे रुजवले गेल्याने नव वर्ष आणि संकल्पसुद्धा बरेच जण १ जानेवारीपासून करतात. 

आपणही काही शुभ संकल्प केले असतीलच - ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा. 


आपण एखादा संकल्प करतो, पण तो पूर्ण होण्याच्या आतच मध्येच सुटून जातो. याला कारण आपले मन आहे. मनावर विजय मिळविला नाही, तर आपण मनाच्या आधीन राहतो आणि मन ज्या दिशेला वळवेल त्या दिशेला जावे लागते. मन हे चंचल असते त्याचा स्वभाव चंद्रासारखा आहे. त्यामुळे आपण केलेले संकल्प मनाच्या लहरीने कदाचित मोडले हि जाऊ शकतील.

मनापेक्षा श्रेष्ठ अशा प्राणाची उपासना केल्यास मनोजयासाठी काही प्रयत्न करावे लागणार नाहीत.

रोज एक - दोन तास तरी स्वत:ला जाणण्याला द्या. खूप अनावश्यक अशी कामे आपण रोज करीत असतो, त्याची यादी करा, ती कामे सोडून द्या आणि स्वत:साठी वेळ काढा.

आपला जो साधनमार्ग असेल त्यावर निष्ठेने अखंडित मार्गक्रमण करीत राहा. आणि रोज काही मिनिटे तरी शांत बसून श्वासावर मन सोडून द्या. श्वास आत जातो बाहेर येतो नुसते बघायचे. परम पूज्य गुरुमहाराज नारायणकाकांनी हाच उपदेश दिला आहे.

हे केले, तर बाकीचे संकल्प पूर्ण होतीलच. मनाची चंचलता आपोआपच कमी होईल. व्यसनाधीनतेपासून सुटण्यासाठी तर हा उपाय सर्वोत्तम आहे.

अल्कोहोल, तंबाखू, धुम्रपान यांतून सुटण्यासाठी कुणी संकल्प केला असल्यास विशेष शुभेच्छा. व्यसनावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या परिवारावर प्रेम करा. जे आपली काळजी करतात, आपल्यावर प्रेम करतात त्यांना व्यसनांमुळे दु:खी करू नका. आपला जन्म मोक्षप्राप्तीसाठी आहे, हा देह त्याचे साधन आहे, त्याला व्यसनांमुळे पोखरू नका.

महागाईच्या आजच्या काळात पैसे वाचविण्यासाठी तरी व्यसने सोडा.

नवीन स्वप्नपूर्तीसाठी - आनंदी राहून भरपूर प्रयत्न करा.... पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा....


मूळ पोस्ट इथे :


Comments