जेव्हा दीपावली येते....

प्रतिमा: विचारयज्ञाचे दिवाळी शुभेच्छापत्रअमावस्येची काळीकुट्ट रात्र सुद्धा प्रकाशाने झगमगते 
जेव्हा दीपावली येते 

अशुभता अमावस्येची पावन लक्ष्मीपूजन होते 
जेव्हा दीपावली येते 
उजळत्या दीपांचा प्रकाश स्मित गाली खुलवतो 
जेव्हा दीपावली येते 
प्रेमाचा प्रकाश आनंद बनून दुमदुमतो 
जेव्हा दीपावली येते
प्रेमबंध दृढ होतात आणि चैतन्य दीप्तीमान होते
जेव्हा दीपावली येते 
सहजच ओठी प्रकाशाचे गीत उमलते 
जेव्हा दीपावली येते 
रांगोळ्यांचे रंग जीवनी रंग भरतात  
जेव्हा दीपावली येते 
आनंदाचे वैभव चोहीकडे सजते 
जेव्हा दीपावली येते 
शुभविचारांचे काव्य पुष्प उमलते 
जेव्हा दीपावली येते 
जेव्हा दीपावली येते!  जेव्हा दीपावली येते, अशी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रकाश आणि प्रेमाचा आनंद घेऊन येणारी ठरो...ती आलेलीच आहे आता! विचारयज्ञ परिवाराच्या सर्व मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! येणारे नववर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जाओ हीच ईश्वरास प्रार्थना! 

आज आपला विचारयज्ञ चार वर्षांचा झाला. मी चार वर्ष लिहितेय, ते केवळ तुमच्यामुळेच. विचारयज्ञास आपले प्रेम आणि प्रोत्साहन ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट अशा सगळ्याच माध्यमातून मिळत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या ईश्वराच्या कृपेशिवाय, माझ्या गुरुमहाराजांच्या कृपेशिवाय हे सगळे शक्य नव्हते. 

असेच प्रेम ठेवा, नाही नाही ते वाढू द्या... :-) 

आपण यापुढे ही विचारांचे कोटी कोटी दीप जगी लावूयात...कायम..सतत निरंतर! :-)   

Comments