कविता: नववर्ष आले आनंदाचे

विचारयज्ञ परिवारातील सर्व बंधू, भगिनी, मित्र , मैत्रिणी सर्वांना मन्मथ नाम नवीन संवत्सराच्या - गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपणां  सर्वांना सुख - समृद्धीचे, आनंदाचे जावो!

नववर्ष नवसंकल्पांचे
नव आशांच्या नव सृजनाचे
नववर्ष आले आनंदाचे || १ ||

नवसमृद्धीची गुढी उभारुनि
नवकाव्याच्या नवसृजनाचे
नववर्ष आले आनंदाचे  || २ ||

नव पालवी सुंदर जणू
ओठी नवस्मित उमलले
नववर्ष आले आनंदाचे || ३ ||

नवसृजनाचा उत्सव हा सृष्टीचा
मोहोर नवआनंदाचे फुलले
नववर्ष आले आनंदाचे || ४ ||

दारिद्र्य दु:ख कुठे मावळले
चिंतेने पार पलायन केले
नववर्ष आले आनंदाचे || ५ ||

सृष्टीचे हे अद्बूत नवरूप
कुणी कसे घडवले
नववर्ष आले आनंदाचे || ६ ||

नववर्षाचे नवगीत हे
सहजचि असे गोड उमलले
नववर्ष आले आनंदाचे || ७ ||

हे काव्य हिंदीत: नववर्ष आया है आनंदका