प्रचंड ऊन आणि असह्य उकाडा यांतून आज अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः वाचवलं. हे सगळं कसं घडलं यावर "थेंबांचं युद्ध" हे काव्य...
काळ्या काळ्या
ढगांचं आक्रमण
निळ्या निळ्या
आभाळावर
क्रूर क्रुद्ध
सुर्यकिरणांशी
तापलेल्या
धरणीला
त्यांच्यापासून
सोडविण्यासाठी
सोसाट्याचा वारा
सारथी झाला
ढगांचा
शंख फुंकिला युद्धाचा
ऐकताच उन्हाला घाम आला
विजेचं अस्त्र
ढगांनी सोडलं
क्रूर किरणांनी
मैदान सोडून
तोंड लपवलं
थेंबांचं सैन्य
थैमान घाली
धरणीही या युद्धाला
आनंदाने पाही
पक्षी झाले या युद्धात दूत
वार्ता पसरविती क्षणात उडून
टपटप टपटप
थेंबांचं युद्ध
टपोऱ्या टपोऱ्या
थेंबांचा मार
कोसळता अंगावर
आज आनंद फार