Wednesday, July 22, 2015

कविता: शब्दांत शब्द गुंफत जाती

काव्य आणि संगीत यांसारखेच जीवनही सुंदर स्वरमय असते. जीवनरूपी काव्यास समर्पित हे गीत...
Image: Wild Flowers
शब्दांत शब्द गुंफत जाती
स्वप्नांत नवस्वप्न जन्म घेती 

उमलता ही भावफुले 
काव्यांतुनि नवकविता जन्म घेती 

स्फुरता भाव दिव्य अनुपम
भावांतुनि कथा नवीन फुलत जाती 

भावना उमलता भावनांतुनि 
भाव नवे जन्म घेती 

भाव हृदयी स्पर्शता 
गीतांतुनि गीत नवे ओठीं जन्म घेती 

गीत गाता हृदयाचे 
संगीतात सूर नवे सुरांना बोलाविती 

शब्दांत शब्द गुंफत जाती....

This Poem in Hindi:

शब्दों से  खिलती माला 


जीवनगीत उलगडणाऱ्या काही कविता: