प्रार्थना: विठूमाऊली

सोबतची प्रतिमा धुळ्याच्या विठ्ठल मंदिरातील आहे. असम्पादित आहे, कारण या कवितेतल्या भावना त्यात आहेत. ....कविता अपूर्ण आहे, पण उद्या मी पंढरपूरात वारीत नसले तरी इथूनच काहीतरी भेट विठोबा साठी द्यायची होती म्हणून अगदी घाई ने विठोबाला पाठवलीले हे काव्य. विठ्ठला ज्ञानमूर्ती तू
तू प्रेमशक्ती
आई आम्हां लेकरा
तू गुरुमूर्ती


लाविसी लळा तव मातृप्रेमे
वारीसी तु माया
तव करुणेने

आम्ही अज्ञजन
संसारे पोळलो अति
आम्ही अहंकारे
तापलो जीवनी

एक प्रेमळ हाक तुझी
दाह शांत करि अमुचा
एक प्रेमळ मूर्ती तुझी
अहंकार मिटवी सारा

आज रीघ दर्शना
लागली तव पंढरीसी
आज लेकरे तुझी
भेटतील चालुनी दिव्य वारीसी

अहंकारे मी मात्र
राही दूर अनाथ
तुजवीण तडपती
प्राण हे दिनरात

अनाथांचा नाथ तू
मग मी का रे दूर?
अहंकार मिटवीसी
मग मी का रे दूर?

तुजवीण एक क्षण
प्राण आता राही ना
तुजवीण एक क्षण
श्वास माझा जाईना

मृत्यू तरी दे
जर जगणे तुजवीण
तव धामी ने मज
जर दर्शन तुझे कठीण

परीक्षा का घेतोस तू
अजाण या बाळाची
ज्ञान मज तुजवीण
भक्ती मुळी नाही मनी

स्मित तुझे दिव्य मधुर
एकदा तरी दावी मला
मीच राहे दूर रडत


विचारयज्ञ मध्ये आणखी भक्तिमय प्रार्थना: