एकत्व आपुले

प्रेमाच्या हृदयातील अस्तित्वामुळे निर्माण होणारी एकत्वाची अनुभूती दिव्य असते. ती भौतिकतेच्या सगळ्या व्याख्यांपलीकडली असते. या उच्च अनुभूतीवर 'एकत्व आपुले' ही कविता. प्रेम या भावनेबद्दल अनेक व्याख्या आहेत, त्याचे अनेक रंग आहेत, छटा आहेत. पण दिवसेंदिवस समाजाचा प्रेम या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित आणि हीन होत आहे. असे असले तरी विचारयज्ञमध्ये नेहमीच उच्च आध्यात्मिक तत्त्वांवरील काव्य व्यक्त करण्याचा प्रयत्न असतो. अशीच आजची कविता प्रेमाच्या दिव्यत्वावर.

या कवितेमागची प्रेरणा या महिन्यात आपल्या कृष्णमोहिनी या फोटोब्लॉग वर प्रकाशित केलेले एक डिजिटल पेंटिंग आहे. पेंटिंग एकत्व या विषयावर आहे. कला मग ती कुठलीही असो, चित्र, संगीत, नृत्य वा काव्य तिचे स्वरूप बदलले तरी मूलतः कला ही एकच असते. एक थेरपी म्हणून काम करतेच करते. व्रणित मनेच सहसा कलाकार होताना दिसतात. रंग डिजिटल असले तरी त्यांचा शीतल स्पर्श मनासाठी औषधी ठरतो. हे पेंटिंग म्हणजे मी एक प्रयोग करत होते नकारात्मक भावना निघून जाण्याची अभिव्यक्ती म्हणून. पण ते बनले अगदी याउलट विषयावर म्हणजे एकत्व, ज्या भावना सदैव हृदयात राहाव्यात अशा भावनांवर या विषयावर. 


Text Image: Marathi Kavita Ektva Aaapule


भिंतींत प्राणाधार हृदयाच्या
त्या वाहिन्यांवरि नाजूक रुधिराच्या
स्थापिले आहे एक
प्रेम आपुले
प्राण ज्याचा असे
एकत्व आपुले
नूतन, नित्य, शुद्ध
क्षणोक्षणी ते वाहत असे
हृदया मम प्राणवायु बनुनि जे.
एकत्व आपुले
चिरंतनता ती अनंताची असे 


In Other Languages: 

विचारयज्ञमध्ये अन्य कविता: 


विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या पोस्ट्स लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address:





Comments