Skip to main content
प्रार्थना: मुक्तीसाठी परमेश्वरास प्रार्थना
धर्म काय आणि अधर्म काय ,
सत्य काय आणि असत्य काय,
नीती काय आणि अनीती काय,
भूत, भविष्य, वर्तमान काय,
योग्य काय आणि अयोग्य काय,
पाप काय आणि पुण्य काय,
कारण,कार्य,आणि परिणाम काय,
कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय,
संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण काय,
कर्ता, भोक्ता आणि कर्म काय,
या सगळ्याचे मर्म सहज ज्ञात असणाऱ्या
परममाता आणि परमपिता परमेश्वरास
आत्यंतिक कळवळून
अखंड
हीच प्रार्थना
माझे व माझ्या सर्वस्वाचे रक्षण करावे आणि
मला सगळ्या कैदेतून,
बंधनांतून मुक्त करावे,
मुक्त करावे,
अभय द्यावे, अभय द्यावे.
विचारयज्ञात अन्य प्रार्थना: