चारोळी: वृक्ष

रणरणत्या उन्हाळ्यात शीतल सावली देऊन आपले पर्यावरण आल्हाददायक बनविणारे आपले मित्र वृक्ष. त्यांच्या प्रेमावर ही चारोळी.

Text image for Vicharyadnya Marathi Charoli Vriksha


अबोल मित्र जीवनाचे
गुपितं निःशब्द बोलती
सळसळ हळव्या पानांची
ऐकूनि शब्द स्तब्ध होती

उद्यापासून एप्रिल महिन्याचा विशेष काव्य महिना सुरू होत आहे. या महिन्यात काव्याबद्दल लोकांमध्ये प्रेम वाढावे म्हणून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांतीलच एक उपक्रम म्हणजे जगभरातील कवी या महिन्यात रोज एक कविता लिहून काव्य साजरे करतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही आपल्या इंग्रजी ब्लॉग नारायणकृपा वर आपण कवितांचा हा महिना साजरा करीत आहोत.

माझा रोज एक कविता ब्लॉग वर पोस्ट करण्याचा प्रयत्न असेल. आपण आवर्जून नारायणकृपा ला भेट द्यावी ही विनंती.


विचारयज्ञ मध्ये अन्य कविता:
  1. चारोळी: कोडे 
  2. संवेदनाहीन भावना
  3. थेंबांचं युद्ध 


विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या कविता लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address: