Friday, October 18, 2013

आदिकवी वाल्मिकी जयंती

आज म्हणजे कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती.  
जगातल्या सर्व सभ्यतांमध्ये - संस्कृतींमध्ये मानवी जीवनाचे सर्वोच्च आदर्श रूप, आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श नाती, आणि सर्वोच्च प्रेम यांचे महाकाव्य रामायण ज्यांनी लिहिले त्या महर्षी वाल्मिकीना कोटी कोटी प्रणाम. महाकाव्य रामायण हे मानवी जीवनातील सर्वोच्च आदर्श तर सांगतेच पण मानवी जीवनाचे सार्थक कसे करावे हेही अति सुंदर आणि सहज वर्णन करते. कलियुगात तर भक्तीशिवाय मुक्तीचा सहज सुगम असा मार्ग अन्य नाही. आणि अशी ही भक्ती वाल्मिकी रामायणामुळे सहज प्राप्त होते. भगवान वाल्मिकी यांनी रामायणाच्या भक्तीने आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तीने आपले जीवन कृतार्थ करावे हीच त्याच्या दिव्य चरणकमळी प्रार्थना.