Friday, December 31, 2010

दशक नवीन आशांचे ..........

अनेक संघर्षातून......या वर्षाच्या आणि दशकाच्या शेवटी खूप आनंददायक भेटी मिळाल्या. पहिलाच IndiRank ५० मिळाला, तुम्हा सगळ्यांशी ओळख झाली. म्हणजे तुम्ही इथे येता, पण तुम्हांला काय वाटतं, ते मात्र तुम्ही जास्त सांगत नाही, मग ओळख वाढणार कशी! IndiBlogger.in वर खूप नवीन मंडळी भेटली. या दशकाची बेस्ट गिफ्ट हे तीन ब्लॉग्स आणि  .......श्री, संजी, दीपक मनिष, मनोज ......प्रमोद सर आणि सौ. प्रमोद सर पण! (श्री=श्रीकांत, संजी=संजीथा, मनिष= ?, मनोज= मनू-शास्त्रज्ञ ) एक नवीन नाव मिळालं ....'मोही'. श्री, संजी, मनिष, दीपक,मनोज .... मी तुम्हांला धन्यवाद मुळीच देणार नाही......( संजी, मनिष आणि दीपक हे वाचणार नाही .......ते मराठी नाहीत .......so sad...... Hey plzzz come here once na...........u wil love dear alll...)

Thursday, December 30, 2010

अर्ध्यावरती विकास पडला.. अपघाताची कहाणी ..
आज ३० डिसेम्बर. मागच्या वर्षी याच दिवशी मला अपघात झाला होता. त्याच्या वेदना आजही ताज्याच आहेत. तुम्हाला त्या अपघाताची कहाणी सांगावीशी वाटतेय. 

मी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता घरी परतत होते.

Wednesday, December 29, 2010

लय जीवनाची कुणी घडवली ....

हिवाळा  चालू आहे, दुपारचे उन सुद्धा अगदी गोड वाटते. मन अगदी शांत  होऊन जाते. शांत निळ्या सरोवरासारखे! कसलेही विचार नाही, कुणाशीही बोलायची इच्छा नाही.....अविचल शांत ...त्या शांत अवस्थेत हृदयातून उठतो एक गोड आवाज .......ईश्वराचा! मग बोल उमटतात दिव्यं. कल्पना सुचतात अतिभव्य! ज्या सर्व कल्पनांच्या पलीकडे असतात. सर्व आभासांच्या पलीकडे....एक सत्य ....सर्वात  सुंदर सत्य ...शिव!
     
लय जीवनाची कुणी घडवली 
चिंता त्यात मी उगा का घातली

Monday, December 27, 2010

सहज सुचलं.......


नि:शब्द बोध हा शब्दात मांडीला.......
शून्याचा खेळ हा गणितात बांधिला
अगणित शब्द संपले तेथे
शून्याचाच बोध पुन्हा उठे येथे........
हाच पाढा जीवनाचा ......
विचार का उगाच दु;खाचा.......
बोधातीत बोध मनाचा ........
शून्यात लय सुख दु:खाचा........
शून्यात लय शून्याचा
संपले शून्य उरले शून्य .....
जीवन भरले आज शून्य .....

मी मराठी  वर नितीन राम यांनी एक सुंदर चर्चा सुरु केली...त्याला उत्तर लिहिताना हे स्फुरलं......असंच....सहज....
मूळ चर्चा इथे बघावी ..नितीन राम यांना खूप खूप धन्यवाद.....त्यांनी 
चर्चेत उत्तरोत्तर अध्यात्म उलगडले .....
आणि 
त्याला उत्तर म्हणून लिहिताना ...
मलाही जीवनाचे काही पदर उलगडले........
उलगडता उलगडता सारे संपले .....
संपता संपता नवे विश्व सुरु झाले ........
संपले तेही शून्य आणि सुरु झाले तेही नवे शून्य........
तुम्हाला खूप आवडेल.....


Friday, December 17, 2010

अक्षय पात्र फौंडेशन - आता पोटभर अभ्यास!

पोटभर अभ्यास ? एवढा अभ्यास कुणाला आवडेल?

गमतीचा भाग जाऊ द्या ! पण एक प्रश्न आहे - उपाशीपोटी अभ्यास कसा करणार ? आणि लहान मुलांना पोटभर खायला लावणं म्हणजे एक दिव्यच!

हे आवडत नाही, ते आवडत नाही !

आपण समजू शकतो, कुपोषणाने मुलांच्या वाढीवर काय परिणाम होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक विकास कसा नष्ट होऊ शकतो. मग शिक्षण आणि त्यांच्या भवितव्याचं  काय होईल!

आज भारतात अशी अनेक खेडी आहेत. लाखो- करोडो लोक आहेत, त्यांना पोटभर जेवण मिळतच नाही! अशी अनेक खेडी आहेत, जिथे अजूनही दोन वेळचे काय पण एक वेळचे ही पोटभर जेवण दुरापास्त आहे.

Monday, December 13, 2010

आम्ही भ्रष्ट राजे...............

'मी डोलकर डोलकर ... ' असं काहीतरी गाणं लहानपणी ऐकल्याचं आठवतं आहे ... पूर्ण तर नाही, पण फक्त एवढ्याच ओळी...थोडसं त्या चालीवर हे गाणं ........तुम्हाला आवडेलच ......


Sunday, December 5, 2010

चैतन्य एकची व्याप्त सर्वत्र

चैतन्य एकची व्याप्त सर्वत्र 
बाह्यभेद जरी भासे 

ईश्वर एकची व्यक्त सर्वत्र 
नामभिन्न जरी भासे
 
चैतन्य हेचि जींवन  सर्वत्र 
रूप बाह्य जरी भासे 

चैतन्य हेचि पूजन केवळ 
मार्ग भिन्न जरी भासे 

हेचि एक सत्य जीवनी 
तंटा तरीही का भासे
 
प्रेम - चैतन्य, चैतन्य - प्रेम
दिव्यता यातच असे  

दिव्यात भरली ईश्वरे 
या मानव जीवनी 

मानव नसे तू दिव्यं ईश्वर 
घे आता जाणुनी 

हीच खरी चैतन्यपूजा 
आनंदाचा मार्ग न दुजा 


आजचा विचार (२१) - कसाब चा द्वेष का ?

जनमानसात कसाब बद्दल द्वेष, चीड दिसते, याचं कारण मला अजिबात कळत नाही. विश्वातल्या सगळ्यांत मोठ्या लोकतंत्रावर - भारतीय संसदेवर हल्ला करण्याच्या कटातील एक तर निर्दोष सुटला. त्या हल्ल्याच्या वेळी ज्यांचे जीव धोक्यात होते ते संसद सदस्य, तत्कालीन गृहमंत्री हे होते.


काही सामान्य नागरिक एका पोराने मारले तर एवढ चिडण्याचं काय कारण? त्यातून त्याचा हा पहिलाच अपराध!


आपल्यातली माणुसकी गेलीय कुठे? 

Saturday, December 4, 2010

आजचा विचार (२० ) -' २६/११ ' - एक सन्मान

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याला '२६/११' असे प्रेमाने म्हणतात. मला २६/११ म्हटलं की '९/११' ची आठवण होते, सगळ्यांनाच होत असेल. २६/११ म्हणण्यामागे ९/११ सारखाच सन्मान भारतालाही मिळाला आहे, याचा 'सार्थ' अभिमान सूचित होतो. मेणबत्त्या लावून तो आनंद साजराही केला जातोय, असं दृश्य दिसतं.

Thursday, December 2, 2010

मरण दिसले

मरण दिसले आज माझे
ठाकलेले उभे समोरी

चित्त झाले भ्रांत माझे
काय हे ठाकले समोरी