Sunday, October 30, 2016

शुभ दीपावली

विचारयज्ञात गेल्या सहा वर्षांपासून सहभागी झालेल्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद विचारयज्ञाचा जन्मदिन असल्याने द्विगुणित होतो. 

सहा वर्षांपासून विविध कविता आणि वैचारिक लेखांच्या माध्यमातून आपला संवाद सुरु आहे, तो यापुढेही असाच सुरु राहावा ही ईश्वरास आणि आपणां सर्वांना प्रार्थना. जुन्या पोस्ट गूगल वर शोधून आपल्या वाचनात पुन्हा पुन्हा येतात हे बघून लिहिण्याचे सार्थक झाल्या चे समाधान मिळते. या समाधानाची शब्दांनी अभिव्यक्ती करणं, केवळ अशक्य आहे. हे स्नेहच लिहिण्यासाठी प्रेरित करते. असेच प्रेरित करत राहावे ही आपणांस पुन्हा प्रार्थना.

दिवाळीचा प्रकाश आपले जीवन आनंद आणि प्रेमाने प्रकाशमान करो.
यापुढेही भेटत राहू, इथेच, असेच! नवीन कविता, नवीन विषय, नवीन लेख यांसह.

Saturday, October 15, 2016

कविता: चंद्रासवे

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...


Image: The Moon and beautiful moonlight


चंद्रासवे चालताना 
तुझ्या स्वप्नांत रमताना
काय सांगू काय जादू होते
एक प्रेमगीत ओठी येते

Saturday, May 28, 2016

कविता: अच्छे दिन आले माझे, बेधुंद नाचायचं

भाजप सरकारच्या शासनाला दोन वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त सरकारी प्रचाराचा भाग म्हणून, गाणी, जाहिराती आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजनही होत आहे. देशातला भीषण दुष्काळ आणि महागाई पाहता, हा जल्लोष खरंच आवश्यक आहे का हे मनात आल्यावाचून राहणे शक्य नाही. या विषयावरंच आजची कविता:

Wednesday, March 16, 2016

श्रीरामस्तुति: श्वास तू, ध्यास तू

ध्यास तू, श्वास तू
ध्येय तू, ध्यान तू,
कर्म तू, कार्य तू,
कर्मकर्ता, कार्यरक्षक तू,
जगदात्मा, जगत्कारण तू,

Saturday, March 12, 2016

सद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु


 सद्गुरू प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या कृपेस अर्पण काव्यात्मक सद्गुरुस्तुती. 

प्रतिमा: प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज


गुरू कृपाळु
गुरु एक जगदाधारु
गुरू एक प्राणाधारु