Saturday, December 10, 2011

श्रीदत्त प्रकटले


अध्यात्माच्या वाटेवर चालायचे ठरवले तर, संसारात ओढण्यासाठी सगळीकडून प्रयत्न केले जातात. कधी कधी वाटते मी चूक तर करत नाही न!
आज श्रीदत्तजयंती श्रीदत्तभगवानच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. 

श्रीदत्त भगवान, देवपूर - धुळे (दत्त मंदिर चौक ज्यामुळे प्रसिद्ध आहे, ते मंदिर)


दत्त दत्त दत्त आले
गृहि आज दत्त आले
साक्षात मम समोरी दत्त आले
आज दत्त मला दिसले

Sunday, November 20, 2011

हनुमंतस्तोत्र

गोस्वामी तुलसीदासजी विरचित हनुमान चालीसात वर्णिलेली हनुमंतस्तुती मराठीत अभिव्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न.


हनुमानजी महाराज धुळे श्रीराम मंदिर

Friday, November 4, 2011

धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय?


धर्मनिरपेक्षता याचा अर्थ नक्की काय, यावर काही दिवसांपासून मनात मंथन सुरु आहे. आज मला पडलेले प्रश्न विचारयज्ञात मांडते, कदाचित उत्तरे सापडतील.

१. धर्मनिरपेक्ष आयुष्य जगणे वास्तवात शक्य आहे काय?

२. धर्म, पंथ, मत, Religion, यांतील भेद आपल्याला सुस्पष्ट ज्ञात आहेत काय?

३. आपला कायदा आणि आपल्या राष्ट्रातील शिक्षणव्यवस्था वरील भेद निसंदिग्धपणे सुस्पष्ट करून सांगतात काय?

४. आपली घटना Secularism म्हणजे सर्वधर्मसमभाव असे सांगते. सर्व-धर्म म्हणजे नक्की काय? असा हा समभाव सगळ्यांच्याच मनात खरंच आहे काय? आणि तो येणे शक्य आहे काय? वेगवेगळ्या पंथीयांसाठी वेगवेगळे कायदे, ही विसंगती सर्व-धर्म-(पंथ)-सम-भाव टिकू देईल का?

५. सनातन संस्कृती ही एक मार्गदर्शक ग्रंथ व प्रेषित यांत मर्यादित (Limited) करता येईल काय? याचे उत्तर जर नाही असेल, तर सर्व-धर्म(धर्म की पंथ?)-सम-भाव म्हणजे नक्की काय?

६. सर्व- पंथांचे सर्वांना सर्व ज्ञान आहे काय?

७. ते ज्ञान प्राप्त करणे सुलभ आहे काय?

८. आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष असण्याची आवश्यकता आहे काय?

९. लोकसंख्या वाढीचे कारण एका व्यक्तीने बहुविवाह करणे नाही काय?

१०.आपल्या राष्ट्राचे तुकडेच मुळी पंथाच्या नावाने केले गेले, यावर कथित धर्मनिरपेक्षता किंवा वास्तव धर्म(पंथ) निरपेक्षता आपल्या राष्ट्रीय सुरक्षेस बाधक सिद्ध होत नाही काय?

हे आणि असे अनेक प्रश्न जिहाद- निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत हे छोटेसे पुस्तक जरा वाचल्यावर मनात आले. आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे ही कळकळीची विनंती.

पुस्तकाची थोडक्यात माहिती

जिहाद

निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत
लेखक:सुहास मजुमदार
अनुवाद: शरद मेहेंदळे, डाॅ. श्रीरंग गोडबोले
सवलत मूल्य: रु. २५/- (मूळ मूल्य: रु. ५०/-)  
प्रकाशक आणि विक्री केंद्र:
भारतीय विचार साधना पुणे

हे  पुस्तक मूळ इंग्रजी ऑनलाइन Jihad - The Islamic Doctrine of Permanent War जिहाद व श्रीमद्भगवद्गीता यांचा तौलनिक अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

पाकिस्तान निर्मिती, Direct Action, काश्मीर प्रश्न आणि सर्व-पंथ-सम-भाव यांचे नवीन आयाम हे पुस्तक वाचल्यावर उलगडतात.
लेखक व अनुवादकारांना अनेको साधुवाद.

हा लेख म्हणजे केवळ विचारमंथन आहे, कुणालाही दुखावण्याचा त्यामागे उद्देश नाही.


Wednesday, October 26, 2011

दीपावलीचा विचारयज्ञआज विचारयज्ञाचा आरंभ होऊन एक वर्ष पूर्ण झाले. आज दीपावलीचा आनंद द्विगुणीत करणारा हा दिवस. गुरुकृपा ब्लॉग सुरु केल्यावर मराठी आणि इंग्रजी एकाच ब्लॉग वर लिहायचे, पण नंतर वाटलं मराठी स्वतंत्र ब्लॉग असलेलाच छान होईल. केवळ मराठी वाचायचे आणि केवळ मराठी लिहायचे असं पूर्ण मराठी ब्लॉग. मला ब्लॉगींग मध्ये सगळ्यात पहिली आणि जिवाभावाची सखी भेटली, ती कांचनताई!कांचनताईंची वेगळी ओळख लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही.

Saturday, September 24, 2011

एक ब्रह्म - श्रीराम

सगळे वादविवाद आणि तर्क जिथे संपतात ते म्हणजे अद्वैत. अद्वैत शाश्वत शांती प्रदान करणारे आहे. आपण भारतीय अतिशय पुण्यवान आणि भाग्यवान आहोत की आपला जन्म अद्वैताच्या या भारत भूमीत झाला.

निर्गुण उपसाकासी जे ब्रह्म
सगुण साकार उपासकां
तोचि श्रीराम
राम तेचि ब्रह्म आदि

Thursday, September 8, 2011

सरस्वती स्तोत्र

शारदीय नवरात्र जवळच आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपासना करण्यास दिव्यं असतात. यावेळी नवरात्रीत देवीस ही प्रार्थना आहे.... 

श्री शारदे जगन्माते बुद्धीदायिनी 
कृपाकटाक्षे पाही मज हे शक्तीदायिनी 
शक्तिरुपिणी मम हृदयी जागृत तू अससी

Wednesday, August 10, 2011

मला आता बोलायचच आहे

खूप काही लिहावसं वाटतं
खूप काही बोलावसं वाटतं
पण का कुणास ठाऊक
शब्द ओठी फुटतच नाहीत
अश्रू डोळ्यांत आहेत

Wednesday, July 20, 2011

राष्ट्रभक्ती - हा एक अपराध आहे का ?

काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाचे मुद्दे नुसते बोलले तरी तो अपराध समजला जायचा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण धर्मनिरपेक्षता असं नुसतं म्हटलं तरी सर्वज्ञ झालोत.

पण आता, राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलायचं तर तो पण अपराध झाला आहे, विशेष म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणारेच दुसऱ्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे कायद्याच्या मर्यादेत आहे, नाकारतात.

या लोकांची निष्ठा खरंच कुठे आहे, हा प्रश्न आहे.

Friday, July 15, 2011

गुरुपूजन व व्यासपूजन - नव्या पद्धतीने

आज गुरुपौर्णिमा - म्हणजे सद्गुरुदेवांचे व भगवान व्यासांचे पूजन करण्याचा दिवस. सद्गुरू दीक्षा देऊन आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करतात - शिष्याला नवीन जीवनच देतात .त्यांच्या कधीही न फिटू शकणाऱ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी थोडेसे पूजन करण्याचा दिवस!


नव ज्ञानार्जनासाठी पुन्हा प्रार्थना करण्याचा दिवस.

Thursday, July 7, 2011

राहुल विंची चे दुहेरी व्यक्तित्व आणि अस्तित्व

राहुल विन्ची ज्यांना बरीच जनता राहुल गांधी समजते, यांच्याबद्दल काही लिहिणे बोलणे मला आवडत नाही. कारण आपल्या प्रसार- माध्यमाना उठसुठ कशालाही महत्व द्यायची किंवा प्रायोजित प्रसिद्धी द्यायची सवय आहे. त्यांच्या जाळ्यात अडकून विषय त्यांना हवा त्या दिशेला नेणे योग्य पण नाही. 

पण इटली मुळाच्या या परिवाराची फसवणूक आता सगळीकडे उघड झालेली आहे, त्यामुळे बोलावे लागले. आणि अजूनही लोकांमध्ये भाबडे प्रेम नेहरू - गांधी परिवाराबद्दल आहे. पण आता राजीवच्या वंशात तरी गांधी म्हणून कुणी राहिलेले नाही.

Tuesday, June 28, 2011

राघव पुन्हा भेटला आज

माझे सद्गुरुदेव परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराज योगमय तपस्वी जीवनाची ८५ वर्ष येत्या ४ जुलैला पूर्ण करीत आहेत. महायोगाबद्दल माहिती अधिकृत संकेतस्थळावर mahayoga.org वर अवश्य बघावी 

माझे  ब्लॉग्स सद्गुरुदेवांनाच समर्पित आहेत. 

पहिला ब्लॉग गुरुकृपा पण ४ जुलैलाच एक वर्ष पूर्ण करतोय. 

या दिव्य आनंदानिमित्त श्री सद्गुरुदेवांना अर्पित हे काव्य .......

मन प्रसन्न झाले आज 
राघव पुन्हा भेटला आज 
गोडी जीवनाची परतली आज 
अमृत नामाचे पीता आज

Thursday, June 23, 2011

निसर्गचक्र आणि कर्म सिद्धांत

निसर्गचक्र आपण नाकारू शकत नाही किम्बहुना आपण ते प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. ऊन - पाउस अणि हवामानात होणारे सगळे बदल.......आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. 

आपण ईश्वराचे अस्तित्व मानू वा न मानू , पण निसर्ग चक्राला आव्हान देणे अशक्य. केवळ अशक्य!!

आपले जीवन जर निसर्गाबाहेर असू शकत नाही, तर आपली कर्मे कशी असतील!

Saturday, June 11, 2011

नेतृत्व ?

  • आतंकवादाविरुद्ध कार्यवाही करण्याचे सामर्थ्य भारतातील नेत्यांकडे कधी येईल ?
  • राष्ट्राच्या सीमांच्या सुरक्षेची ज्यांना काळजी नाही, ते भ्रष्टाचाराविरुद्ध काही कसे करू शकतील ?

Friday, June 10, 2011

एकच शक्ती सर्व जगति

एक शक्ती सर्व जगति
कार्य करण्या भरली आहे 
कार्य सदा करीत असुनी 
ती अचल बनुनि राहे 
सूर्य बनुनि उष्ण तीच

Thursday, June 9, 2011

भारतीय लोकतंत्र - आता सरकारी दमनतंत्र

आतंकवादाचे संरक्षण करता करता, आता केंद्रीय सरकार स्वत:च आतंकवादी बनले, हा संगतीदोष म्हणावा का समानशीलेषु व्यसनेषु सख्यं याचे उत्तम उदाहरण म्हणावे? 

आता पुढे काय? 

विपक्ष म्हणजे आनंदी आनंद आहे!

पत्रकार म्हणजे नुसता गोंधळ आहे!

जनता निराश आहे, त्यात थोडी एकता झाली तर हे अत्याचार! 

सक्षम नेतृत्व कुठेच दिसत नाही!

आपल्याला काय वाटते?

याच विषयावरचा माझा इंग्रजी लेख  Indian Democracy In Danger  आणि हिंदी कविता व लेख दम घुटता है यहाँ अब त्यावर हि आपले विचार अवश्य कळवावेत. 

Saturday, May 28, 2011

क्रांतीचा धगधगता सूर्य - स्वा. सावरकर

अमोलजी देशमुख यांनी स्वा. सावरकरांवर लेख लिहिण्यास प्रेरित केले. बऱ्याच महिन्यांपासून काही अडचणींमुळे तो लेख राहिला होता. तो आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. आपल्या प्रोत्साहनाबद्दल अमोलजी हृदयापासून धन्यवाद!


'माझी जन्मठेप' मधून मला शिकायला मिळालेले मुद्दे या लेखात आपल्यासमोर मांडत आहे. आपण कृपया आपले विचार इथे अवश्य व्यक्त करावेत.

Wednesday, May 25, 2011

अंतरीच ज्ञान प्रकटले

जाहले मज दर्शन मातेचे 
अंतरीच प्रकटले रूप लक्ष्मीचे
मी न हीन - दीन लाचार 
जगन्माता हृदयी मम साचार 
मी न मुळी सामान्य 
जन्म - मरण चक्र मज मुळी अमान्य

Friday, May 20, 2011

आभास मात्र तो आहे


सुख - दु:खे दिसती अनंत 
आभास मात्र तो आहे 
वादळे निराशेची उठती अनंत 
आभास मात्र तो आहे 
विचार अनंत उठती जरी 
आभास मात्र तो आहे 
घोर संकटे जरी चहुकडे
 आभास मात्र तो आहे 
सर्व ह्या आभासांपलीकडे 
सत्य शाश्वत ईश्वर आहे 
जाणुनि घेता त्या ईशा
आभास जो होता सदा 
आनंद झरा प्रकटे त्यातच खरा 

Tuesday, May 10, 2011

आजचा विचार

एक विचार असा जो भारतातील युवकांची गुलाम मानसिकता बदलेल, असा एक विचार जो राष्ट्राभिमान जागृत करेल, असा एक विचार मला हवाय, तो कुठला असेल?

Sunday, May 8, 2011

आजचा विचार

आपणच विचार करणे सोडून दिले, तर सरकारवर दबाव कोण आणेल ? मी एकटा काय करू, असा निराश हताश विचार ठेवला तर, आपण सरकारला निर्लज्ज व्हायला प्रोत्साहन देतो. निर्णय आपला आहे, कशाला प्रोत्साहन द्यायचे ते !

Saturday, May 7, 2011

आजचा विचार


आतंकवादावर भारताच्या नाकर्तेपणाच्या धोरणावर आज इतकी चीड आली आहे की बोलायला शब्द नाहीत ! कधी आपल्यातला स्वाभिमान - राष्ट्राभिमान जागृत होईल? राष्ट्राच्या शत्रूंशी मैत्री करण्याची हि विकृती कधी तरी थांबेल का ? 
आपल्या जनतेची याला आनंदाने स्वीकृती थांबेल का?

Thursday, May 5, 2011

आजचा विचार

आजचा दिवस आपणां सर्वांना खूप सुंदर जाओ, एक - एक सुंदर विचार एक सुंदर आयुष्य बनविणारा ठरो. असेच सुंदर सुंदर विचार माझे आणि तुमचे जीवन समृद्ध करो! 

Wednesday, May 4, 2011

आजचा विचार

खूप खूप विचार करून जेव्हा मन सुन्न होतं, तेव्हा सगळे विचार संपतात. पण जेव्हा हा वैचारिक प्रलय होतो, तेव्हा एक नवा विचार जन्म घेतो ! आणि हा नवा विचार वैयक्तिक आणि सामाजिक जीवन पण परिवर्तीत करू शकतो !

Tuesday, May 3, 2011

आजचा विचार

सगळं सोपं आहे , तरी जीवन इतकं कठीण का ?

Monday, May 2, 2011

आजचा विचार

मनच गुलाम असेल तर बाह्य स्वातंत्र्याचा आनंद कशाला? 
का उगाच भ्रमात राहावे? जीवन खुळे का जगावे?

Friday, April 15, 2011

साधना


सिद्धयोग साधनेबद्दल हृदयाचे काही बोल , ज्या साधनेने माझं जीवन परिपूर्ण बनवलं, पण जी साधना कधीच पूर्ण होऊ शकत नाही , अशा आत्मनिवेदन रूप भक्तीचे हे सर्वश्रेष्ठ रूप. जीवनाच्या प्रत्येक क्षणी अनुभवताना काय आनंद होतोय ते शब्दात बांधणे तर शक्य नाही , पण तरी हि छोटीशी अभिव्यक्ती !


साधना हेच जीवन माझे 
साधना हेच सर्वस्व माझे 
हर श्वास माझा साधना

Wednesday, March 23, 2011

एक कळी पुन्हा बोलली


खूप दिवसांनंतर आपल्याशी बोलतेय. खरंच क्षमस्व. मध्ये जरा बरं नव्हतं आणि बरेच दिवस नेट पण बंद होतं. त्यामुळे बराच वेळ गेला. 


एक कळी पुन्हा बोलली 
लाजता लाजता कळी खुलली 
गुलाबी गुलाबी गालांवर 
लाली आज पुन्हा दिसली 
गोड कळी पुन्हा लाजली 
उमलता उमलता पुन्हा मिटली 
मिटता मिटता पुन्हा उमलली 
गोडी जीवनाची तिला कळली 
ओठी लाली पुन्हा उमटली 
गोड स्मित गोड डोळे 
चुकून गुपित काय बोलले 
प्रेम म्हणे मजला झाले 
वेडे मला 'त्याने' केले 
काय हे 'राधे' तू म्हणालीस 
वेडे तर तू मला केले
ऐक रे 'श्याम' ! प्रेम तुझे 
वेड मजला असे लाविते 
तुझेच गीत गात राहते 
स्वतःलाही मी विसरते 
'श्याम' रे! तू प्राण माझा 
सखा तूच पती माझा 
गोड प्रेम हे राधा बोले 
ऐकता ऐकता मन वेडे होते 
वेडा श्याम वेडी राधा 
प्रेमाची गोडी राधा 
राधेशिवाय प्रेम नं जगती
राधेनेच दिली भक्ती 
प्रेम हीच जीवनाची शक्ती 
    

Wednesday, February 2, 2011

शपथ घेतो आज हि

परवा म्हणजे ३० जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेप (२ जन्मठेप ) झाल्याची शताब्दी होती, खरं म्हणजे हे लक्षातच नव्हतं, नाहीतर विशेष लेख वा कविता प्रसिद्ध करता आली असती, त्याबद्दल क्षमस्व! खरं म्हणजे कुणाची क्षमा मागणार? आपण एवढा मोठा दिवस विसरलो, देशासाठी सर्वस्व सहज आनंदाने एखादे फुल अर्पण करावे तसे ज्यांनी केले, त्यांच्याबद्दल एवढी तरी कृतज्ञता हवी. हि कृतज्ञता श्री. अमोल देशमुख यांनी मीमराठी ( http://www.mimarathi.net/स्वा. सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी वर अभिव्यक्त केली. त्यावर प्रतिसादहि सुंदर आले.कोण देशभक्त स्वा. सावरकरांचा विरोध करेल! याचाच उलटा अर्थ स्वा. सावरकरांचा विरोध व द्वेष करणारा हा देशभक्त तर सोडाच पण देशद्रोही आहे. अरे म्हणजे यांची निष्ठा कुठे दुसरीकडे तर नाही ना ? काय आपण सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे अजून काय बोलणार?

असो. या प्रतिसादांमध्ये श्री. गब्बर सिंगांचा (ते हेच नाव मिम वर लिहितात ) प्रतिसाद वाचून..त्यापासून प्रेरणा मिळून हि कविता सुचली .....

तो प्रतिसाद - आपल्या स्वातंत्र्यासाठी ... त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. We literally owe our liberty to them ...

स्वातंत्र्यसूर्य सावरकर ... तू सूर्याचे तेज उदधिचे गांभिर्यही तूची ...
आणि मला स्फुरलेली कविता अशी ..
स्वातंत्र्यवीर सावरकराना करोडो करोडो वंदन !

अशीच द्या स्फूर्ती आम्हा,
गतवैभव राष्ट्राचे पुन्हा आणण्या,
जीवन आपुले सूर्य आम्हा,
प्रकाश देते पुन्हा लढण्या,
हरलेलो जरी आज दिसतो,
उठू पुन्हा तव प्रेरणेने
जीवन अर्पू मातेस या
केवळ तव आशीशाने 
केवळ तव आशिशाने
वैभव उजळू पुन्हा देशाचे
शपथ घेतो आज हि
तव विचार हे अमृत मम
त्याबळे पूर्ण करू ती

त्याबळे पूर्ण करू ती
पुन्हा पुन्हा आशिष मागतो 
विजयटिळक व्हावा आता 
शत्रूंचा साऱ्या राष्ट्राच्या 
नि:शेष व्हावा आता पुन्हा 
अशेष भारत शांत व्हावा 
वैभवाने फुलून यावा 
वैभव दिसो पुन्हा मातेचे 
वैभव सनातन संस्कृतीचे 
दिव्यं रूप ते सीतेचे 
वैभव मर्यादापुरुषोत्तमाचे 
आशिष घे हा ईश्वराचा 
तुजवरी सदा जो वर्षतो आहे 
राष्ट्रकार्य करण्या प्रेरणा 
बनुनी वाहतो आहे 
शब्दवैभव अमिट हे 
पसरू दे तिन्ही लोकी 
यश हे वर्तविणार या जगी 
सदा केवळ मानवतेचे 
भुलली जनता ज्या भ्रमाला 
जाळे ते तू तोडूनी दे 
विच्छेद कर संशयाचा साऱ्या 
प्रकाश ज्ञानाचा पसरू दे 
भिऊ नकोस नकोस थांबू 
नकोस रडू खोट्या भयाने 
जग हे आहे सत्यासाठी 
त्यास जाणुनी अभय आता 
जगी पुन्हा पसरू दे 
विचार नको, नको ते संशय 
मागे नेती यशास जे 
शांत हृदय - दृढ निश्चयाने
कालचक्र आता फिरवायचे 
कालचक्र आता फिरवायचे .......  


लिहिता लिहिता हा एक संवादच झाला, ईश्वराचा आणि माझा, स्वा. सावरकरांचा आणि माझा किंवा सद्गुरूंचा (प. पू. नारायणकाका महाराज )आणि माझा! इथे माझा, म्हणजे 'मी' जो अनेक संशयांनी ग्रस्त असतो , राष्ट्रसेवा करण्याची इच्छा असूनही उगाच पाय मागे घेतो, अध्यात्मातही उगाच भितो, उगीचच घाबरतो आणि उगीचच भ्रमाला भुलतो..तो 'मी'.......आपल्या सगळ्यांचा 'मी' असाच कधी कधी किंवा बऱ्याचदा त्रास देतो ना...बघा ..त्याला आज उत्तर मिळालं आहे ..ते पण छानसं ! आता मागे फिरायचं नाही, जो सद्निश्चय राष्ट्रासाठी केलाय, समाजासाठी केलाय, तो योग्य मार्गाने निर्भयपणे पूर्ण करायचाच......ईश्वराचे आणि स्वा. सावरकरांचे आशिष आहेत.श्री. गब्बर सिगांच्या ओळी वाचून प्रेरणा मिळाली. धन्यवाद श्री. गब्बरजी ! धन्यवाद श्री. अमोलजी ! श्री. अमोलजींचे अजून एक प्रेरणास्पद वाक्य इथे देते...ज्याने हि कविता लिहिताना प्रेरणा मिळाली -
"कशाचाही आधार घ्या पण देशविघातक शक्तींचा नि:पात करा....."


श्री. रणजितजींचा support आणि प्रोत्साहन तर आहेच.....