Thursday, December 12, 2013

गीता जयंतीनिमित्त भगवद्गीता पारायण

नमस्कार बंधुंनो!

उद्या मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंती आहे. गीता जयंतीस वैश्विक गीता जयंती पारायण समारोह आपण सगळे फेसबुकच्या माध्यमातून करूयात. पारायण आपापल्या घरी करावयाचे आणि त्याची नोंद पुढील event वर द्यावी. आपण सर्व या समारोहात अवश्य या. गीतेची जास्तीत जास्त पारायणे उद्या म्हणजे १३ डिसेम्बर ला व्हावीत.

कारण गीता धर्मयुद्ध करण्यास्तव प्रेरणा आहे.

गीता ज्ञान, कर्म आणि भक्तियोग यांचा संगम आहे.

गीता प्रत्येकासाठी आहे.

गीता साक्षात जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे, साक्षात त्यांचा उपदेश केवळ आपल्यासाठी.

काही विद्वान म्हणतात, नुसती संस्कृत गीता वाचून काय होणार?

Sunday, November 3, 2013

विद्या - विवेक तेजोमय विचारयज्ञ

विचारयज्ञात सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दीपावली आपले जीवन प्रेम, ज्ञान व आनंद यांनी आपले जीवन उजळविणारी ठरो …आज लक्ष्मीपूजन - माता महालक्ष्मीची आराधना उपासना करण्याचा आनंदाचा दिन. आई लक्ष्मी  ही भक्तांना केवळ धन - धान्यच देत नाही तर विवेकपूर्ण विचार आणि विद्या सुद्धा देते.

Friday, October 18, 2013

आदिकवी वाल्मिकी जयंती

आज म्हणजे कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती.  
जगातल्या सर्व सभ्यतांमध्ये - संस्कृतींमध्ये मानवी जीवनाचे सर्वोच्च आदर्श रूप, आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श नाती, आणि सर्वोच्च प्रेम यांचे महाकाव्य रामायण ज्यांनी लिहिले त्या महर्षी वाल्मिकीना कोटी कोटी प्रणाम. महाकाव्य रामायण हे मानवी जीवनातील सर्वोच्च आदर्श तर सांगतेच पण मानवी जीवनाचे सार्थक कसे करावे हेही अति सुंदर आणि सहज वर्णन करते. कलियुगात तर भक्तीशिवाय मुक्तीचा सहज सुगम असा मार्ग अन्य नाही. आणि अशी ही भक्ती वाल्मिकी रामायणामुळे सहज प्राप्त होते. भगवान वाल्मिकी यांनी रामायणाच्या भक्तीने आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तीने आपले जीवन कृतार्थ करावे हीच त्याच्या दिव्य चरणकमळी प्रार्थना. 

Tuesday, September 10, 2013

श्रीगणेश स्तवन - 'प्रार्थिता तुज हे गणपती'

आज गणरायांच्या आगमनाने प्रत्येक घर आनंदले आहे. खेड्यापाड्यात - शहरा -नगरांत अगदी सगळी कडे चौकाचौकात अवर्णनीय उत्साह आणि आनंद वाहतो आहे. कारण, आपला सगळ्यांचा लाडका पाहुणा, आपला गणपती बाप्पा दहा दिवस आता आपल्याकडे राहणार आहे, आपले मोदक, लाडू, खिरापत आणि मनोभावे केलेली पूजा या सगळ्यांचा स्वीकार करणार आहे.

Tuesday, May 28, 2013

सावरकरांचे धगधगते विचारकार्य - आजच्या काळाची पहिली आवश्यकता

हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्यवीर सावरकर खरे - प्रामाणिक हिंदुत्ववादी नेता.

Monday, May 13, 2013

भगवान परशुराम - अधर्माविरुद्धचा चिरंजीव धर्मयोद्धा

आज भगवान परशुराम यांची जयंती. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे भगवान विष्णूंच्या सहावा अवतार – राम , भार्गवराम किंवा परशुराम यांची जयंती. तृतीया दोन दिवस येत असेल तर प्रदोषकाळी तृतीया ज्या दिवशी पडेल ती म्हणजे भगवान परशुरामांची जयंती. त्यामुळे या वर्षी काही ठिकाणी १२ मे ला परशुराम जयंती साजरी केली गेली , तर काही ठिकाणी आज म्हणजे दिनांक १३ मे ला साजरी होत आहे.

Friday, April 19, 2013

श्रीराम जन्मले - प्रभू अवतरले


नमस्कार बंधू भगिनींनो! आज प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म. रामनवमी. राम असे एकदाच म्हटले तरी हृदय आनंदाने भरून जाते, पुढे बोलायला शब्दच उरत नाही. आज तर अशा रामाचा जन्म..म्हणजे सगळीकडे आनंद केवळ आनंद ..:). हा दिव्य आनंद आपल्या सर्वांच्या जीवनी भरून राहो ...हार्दिक शुभेच्छा. 

आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या चरणकमळी एकंच प्रार्थना "हे प्रभो ! मन सदा धर्मातच रममाण राहो. अधर्माचा तर मनासही स्पर्श नको. मला तुझी कायम आठवण राहील की नाही भीती वाटते, म्हणून तूच माझ्या हृदयात सदासाठी विराजमान हो. म्हणजे तुझ्यावाचून माझा एक क्षणही जाणार नाही. आणि जिथे तू, तिथेच धर्म, शांती आणि प्रेम आहे. तुझ्याविना मात्र दु:खच आहे. म्हणून एकच प्रार्थना कायम माझ्या हृदयात राहा. धर्म – अध्यात्म आणि तुझे प्रेम हे सगळे तर तुझ्या हृदयात राहण्याने सहजच प्राप्त होणार आहे. 
तुझ्याविना अर्धा क्षणही व्यर्थ न जाओ."