Friday, May 15, 2015

"केशव मनोहर लेले": मन विषण्ण करणारा अनुभव

गेल्या शनिवारी ‘केशव मनोहर लेले’ नाटक यु ट्यूब वर बघितले. बरीच जुनी-नवी नाटक बघायची राहिली आहेत. जमेल तसे विडीयो वर बघते. कुसुम मनोहर लेले काही वर्षांपूर्वी बघितले होते. खऱ्या घटनेवर हे नाटक आधारलेले आहे आणि नायिका झालेल्या फसवणुकीने भ्रमिष्ट झाली असे वाचले होते. त्यामुळे दुसरा भाग काय असेल याची खूप उत्सुकता मनात होती, पण या शोकांतिकेतून चांगला शेवट निघण्याची अपेक्षा नसल्याने पुढचा भाग बघायची इच्छा बरेच दिवस टाळत होते. अखेरीस केशव मनोहर लेले बघितलेच. या नाटकावर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर काही विचार.

Wednesday, May 13, 2015

कविता: थेंबांचं युद्ध

प्रचंड ऊन आणि असह्य उकाडा यांतून आज अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः वाचवलं. हे सगळं कसं घडलं यावर "थेंबांचं युद्ध" हे  काव्य...