Tuesday, September 22, 2015

स्तोत्र: देई कल्याणजन्म भक्तांसी

गणेशोत्सवानिमित्त श्रीगणरायाची स्तुती व प्रार्थना

Image: Lord Ganesha
प्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा संग्रहातून 

चैतन्य आनंद वर्षे तव आगमनाने |
दिव्यभक्ती हृदयातुनि उठे आर्तभावाने || १ ||

Friday, September 18, 2015

प्रार्थना: नमन तुजला हे गजानना

गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच पाउस ही आला; जणू विघ्नहर्ता गणेशाने दुष्काळाचे विघ्न दूर करण्याचे ठरवलेय. गणेशोत्सव व वातावरणातील आल्हाददायक बदल,मन प्रसन्न करीत आहे. विचारयज्ञमध्ये आजची प्रार्थना भगवान गणेशास. ही प्रार्थना विशेषतः पुण्यातील सारसबागेतील गणपतीसाठी स्फुरली. मंत्रमुग्ध करणारे, मधुर स्मित असलेला गणपती माझी प्रार्थना स्वीकारो. 

Image: Bhagwan Ganapati

प्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा संग्रहातून 
हे विनायका, बुद्धिदायका|
नमन तुजला हे गजानना||

Wednesday, September 9, 2015

कविता: संवेदनाहीन भावना


दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षाही भयंकर काही असेल तर या घटनांप्रती असलेली असंवेदनशीलता. याच विषयावर आजची वेदना...

Saturday, September 5, 2015

कविता: कृष्ण...कृष्ण...कृष्ण

विचारयज्ञ परिवारातील सर्व वाचकांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा उत्सव कृष्णभक्तीमय , आनंद आणि उत्साहाने भरलेला ठरो ही कृष्णास प्रार्थना. कृष्णनाम हे इतके गोड आहे की नाव घेताच काव्य स्फुरते.. कृष्णाच्या मधुर नावास समर्पित आजचे काव्य.

Image: Bhagwan Shrikrishna


जीवनाचा अर्थ सापडे आज
कृष्ण... कृष्ण... कृष्ण...