Thursday, November 6, 2014

स्त्रियांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे की नाही?: समज - अपसमज

आज कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक स्वामी दर्शनाबद्दल एक मुख्य समज लहानपणापासून ऐकत आलेय – महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेतले तर ‘काहीतरी’ विपरीत होणार कारण कार्तिक स्वामिंचाच तसा शाप आहे असे मानले जाते. विपरीत म्हणजे काय ते आता माझ्या लक्षात नाही. बरेचसे लोक हा समज खरा मानतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

Thursday, October 23, 2014

जेव्हा दीपावली येते....

प्रतिमा: विचारयज्ञाचे दिवाळी शुभेच्छापत्रअमावस्येची काळीकुट्ट रात्र सुद्धा प्रकाशाने झगमगते 
जेव्हा दीपावली येते 

Saturday, September 13, 2014

...आणि माझा अहं विठुरायाच झाला

त्याला  सावळा विठोबा म्हणा वा मुरलीधर कृष्ण म्हणा, वेड तर तो लावणारच आहे, पण तो खोडकर असा आहे की वेड लावून गायब होतो. मग आम्ही करायचे तरी काय?.....

Friday, August 29, 2014

गणपती उजव्या सोंडेचा की डाव्या ? - भ्रम, भीती, आणि वास्तव


णेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का?

गणेशोत्सव आणि राष्ट्रभक्ती - पुन्हा सुरु होऊ शकते?

विचारयज्ञ परिवारातील सर्व वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान गणपती आपल्या आध्यात्मिक प्रगतीतील विघ्ने दूर करून आपल्याला सर्वांना परमशांतीच्या पथावर अग्रेसर ठेवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!

Friday, August 15, 2014

स्वातंत्र्यदिन साजरा करताना भारताच्या सुरक्षेसमोरील ३ आव्हाने

सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताच्या अंतर्गत आणि सीमासुरक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. राष्ट्राला केंद्रीभूत ठेऊन ही चर्चा करणे आवश्यक आहे.

जे जे जिथे जिथे चुकले ते सगळे सुधारणे आवश्यक आहे.

Monday, March 31, 2014

गीत नववर्षाचे

विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना जय नामक हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या, वासंतिक नवरात्रोत्सवाच्या व श्रीराम नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष आपणां सर्वांना सुख, समृद्धी, भरभराट, शांती आणि आनंदमय ठरो ही श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!

Wednesday, January 15, 2014

सोशल मिडियाचे व्यसन : साधनेला बाधक

फेसबुक आणि सोशल मिडियाचे अत्यधिक व्यसन आध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरू शकते. सोशल मिडिया साईट्सवर अनंत विषयांवर अनंत पोस्ट्स सुरु असतात. यापैकी कितीतरी निरर्थक असतात. पण त्याकडे लक्ष वेधले जाते. १० वेगवेगळे लेख वाचणे आणि फेसबुकवरील लहान मोठ्या १० पोस्ट्स वाचणे यात खूप फरक आहे. आपल्या मनाची एकाग्रता होतच नाही. सतत नवनवीन विचारतरंग मनात उठत असतात.

Sunday, January 12, 2014

स्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला


स्वामी विवेकानंदांच्या १५१ जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, January 1, 2014

संकल्पपुर्तीस्तव प्राणपूजा

नवीन वर्षाच्या संकल्पपूर्तीसाठी काही विचार आपल्या फेसबुक पानावरून :

नवीन वर्षाच्या सुरुवातीला बहुतेक सगळे काही नवीन संकल्प करतात. ख्रिस्ती दिनमान इथे रुजवले गेल्याने नव वर्ष आणि संकल्पसुद्धा बरेच जण १ जानेवारीपासून करतात. 

आपणही काही शुभ संकल्प केले असतीलच - ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा.