विचारयज्ञमध्ये शोधा

Thursday, August 3, 2017

स्तोत्र: राम एक सर्वसमर्थ

आनंद आनंद आनंद राम
प्रेम प्रेम प्रेम एक राम
मुक्ती मुक्ती मुक्ती राम
भक्ती भक्ती एक राम
राम जीवन राम ध्येय
राम ध्यास राम श्वास
एक राम एक नाम
एक राम एक ध्यान
एक कार्य एक कर्म
राम नाम हा स्वधर्म
राम तप राम शांती
राम वेद राम श्रुती
राम तत्त्व राम धर्म
राम एक सर्वसमर्थ
राम कृपानिधान एक
राम आनंदधाम एक
राम गेय राम गीत
रामनाम हेच हित
राम स्तुती राम स्तुत्य
राम नाम एक नित्य
रामनाम एक सत्य
रामनाम एक सत्य

Monday, July 31, 2017

कविता: वेदना

माझेच होते आकाश माझेच ते आहे
माझेच होते पंख मजपाशीच आहेत
विसरूनि स्वतः स उडायचे विसरले

माझेच स्वप्न जगायचे होते विसरले
माझीच कथा लिहिणार कोण आणि?
माझीच आहे वेदना जाणणार कोण आणि?

वेदनेतच पंख आहेत माझे
वेदनाच प्रेरणा भरारीस
वेदनाच फुंकर जखमेची
वेदनाच आशा* जगण्याची
वेदनाच साक्ष आहे वेदनेची
वेदनाच वाट** आहे मुक्तीची

*वेदना आहे, दुःख आहे, भावना आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. जीवन आहे तर आशा आहे. मृत व्यक्तीला दुःख नसते आणि जीवन पण. संवेदनाहीन जीवन मृत जीवनच असते.

**दुःख आहेत म्हणून बद्ध असण्याचे स्मरण असते आणि म्हणूनच मुक्तीची ओढ पण असते.


Friday, April 28, 2017

कविता: प्रेममुग्ध

मधुर गीत तू मम हृदयाचे
सूर न तव थांबावे ऐकताना
क्षण एकदाच स्तब्ध व्हावे
मधुर शब्द तव ऐकताना
मधुर बोल तुझे प्रीतीत रमलेले
संगीत मज मधुर ऐकताना
सुखदुःख क्षणात विरुनि जावे
मन तुझ्यातच गुंतताना
स्मित हळूवार स्पर्शावे मनास
प्रेममुग्ध नयन तव पाहताना

Sunday, October 30, 2016

शुभ दीपावली

विचारयज्ञात गेल्या सहा वर्षांपासून सहभागी झालेल्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद विचारयज्ञाचा जन्मदिन असल्याने द्विगुणित होतो. 

सहा वर्षांपासून विविध कविता आणि वैचारिक लेखांच्या माध्यमातून आपला संवाद सुरु आहे, तो यापुढेही असाच सुरु राहावा ही ईश्वरास आणि आपणां सर्वांना प्रार्थना. जुन्या पोस्ट गूगल वर शोधून आपल्या वाचनात पुन्हा पुन्हा येतात हे बघून लिहिण्याचे सार्थक झाल्या चे समाधान मिळते. या समाधानाची शब्दांनी अभिव्यक्ती करणं, केवळ अशक्य आहे. हे स्नेहच लिहिण्यासाठी प्रेरित करते. असेच प्रेरित करत राहावे ही आपणांस पुन्हा प्रार्थना.

दिवाळीचा प्रकाश आपले जीवन आनंद आणि प्रेमाने प्रकाशमान करो.
यापुढेही भेटत राहू, इथेच, असेच! नवीन कविता, नवीन विषय, नवीन लेख यांसह.

Saturday, October 15, 2016

कविता: चंद्रासवे

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...


Image: The Moon and beautiful moonlight


चंद्रासवे चालताना 
तुझ्या स्वप्नांत रमताना
काय सांगू काय जादू होते
एक प्रेमगीत ओठी येते

Saturday, May 28, 2016

कविता: अच्छे दिन आले माझे, बेधुंद नाचायचं

भाजप सरकारच्या शासनाला दोन वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त सरकारी प्रचाराचा भाग म्हणून, गाणी, जाहिराती आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजनही होत आहे. देशातला भीषण दुष्काळ आणि महागाई पाहता, हा जल्लोष खरंच आवश्यक आहे का हे मनात आल्यावाचून राहणे शक्य नाही. या विषयावरंच आजची कविता: